'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमांत इतिहासाचा विपर्यास, संतापलेल्या संभाजीराजेंनी केली 'ही' मागणी

Sambhajiraje Press Conference: संभाजीराजे छत्रपती यांनी एक पत्रकार परिषद घेत आगामी सिनेमांवर आक्षेप घेतला आहे. 'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमांत इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने संभाजीराजेंनी या सिनेमांवर आक्षेप घेतला आहे.

Sambhaji Raje Chhatrapati angry over distortion of history in har har mahadev vedat marathe veer daudale saat watch video
'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमांत इतिहासाचा विपर्यास, संतापलेल्या संभाजीराजेंनी केली 'ही' मागणी  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांवर संभाजीराजेंचा आक्षेप
  • ऐतिहासिक सिनेमांमध्ये इतिहासाची मोडतोड, संभाजीराजे आक्रमक
  • सिने निर्मात्यांना संभाजीराजेंचा इशारा

Sambhajiraje objection on har har mahadev and vedat marathe veer daudale saat movies: ऐतिहासिक घटना आणि इतिहास यावर बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमा बनवण्यात येतात. त्याचप्रमाणे 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे सिनेमा आहेत. मात्र, या सिनेमांत इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत सिनेमांवर आक्षेप घेतला आहे. (Sambhaji Raje Chhatrapati angry over distortion of history in har har mahadev vedat marathe veer daudale saat watch video)

ऐतिहासिक सिनेमांत इतिहासाची मोडतोड केली जात आहे. तसेच या सिनेमांत इतिहासाचा विपर्यास केला असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमांवर संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे. 'हर हर महादेव' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तर 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

काय म्हणाले संभाजीराजे?

हर हर महादेव हा जो सिनेमा आता रिलीज झाला आहे त्यात इतिहासाची मोडतोड केली आहे. इतिहासाचा विपर्यास केला आहे. हे सिनेमा आपण लोकांसमोर घेऊन जायचे का? शिवाजी महाराजांकडे आपण कसे पाहतो... ती आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे. सिनेमाचं ड्रामाटायझेशन म्हणून किती आणि काय बदल करायचा? पोस्टरमध्ये मावळ्यांची पगडी काढलेली आहे. पगडी काढणे म्हणजे हा एक प्रकारचा शोक आहे असंही संभाजीराजे म्हणाले.

हे पण वाचा : Skin Care मध्ये अशा प्रकारे वापरा कॉर्नस्टार्च

'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाचं पोस्टर दाखवत संभाजीराजे म्हणाले, या सिनेमातील पोस्टरमध्ये मावळ्यांचे पोषाख पाहा. हे मावळे दिसत आहेत का? हे चालणार नाही यापुढे... ऐतिहासिक सिनेमांत इतिहासाची मोडतोड करुन सिनेमा निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे.

हे पण वाचा : वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी अशी हवी बेडरूमची रचना

ऐतिहासिक सिनेमा काढायचे असल्यास तर सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक सिनेमांसाठी एक समिती असावी. माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की अशी समिती असायला हवी. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमांना परवानगी दिलीच कशी अशी विचारणा करणारे पत्र आम्ही लिहू असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी