Sameer Khakhar passed away: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता सिनेसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता समीर खक्कड (Sameer Khakhar) यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी अनेक मालिका, सिनेमांत भूमिका केल्या होत्या.
समीर खक्कड यांनी 1987 मध्ये आलेल्या जवाब हम देंगे या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांत भूमिका केल्या. मेरा शिकार, शहंशाह, गुरू, नफरत की आंधी, परिंदा, शहजादे, वर्दी, अव्वल नंबर, धरती पूत्र या सारख्या सिनेमांचा त्यात समावेश आहे.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
दूरदर्शनवर येणारा प्रसिद्ध शो 'नुक्कड' मध्ये खोपडी ही व्यक्तीरेखा साकारली होती आणि या भूमिकेतून त्यांनी सर्वांचीच मने जिंकली होती. 2020 मध्ये सुद्धा त्यांच्या अभिनयाची चर्चा झाले जेव्हा ते नवाजुद्दीन सिद्दिकीच्या सीरियस मॅन मध्ये दिसले होते. या सिनेमात त्यांनी एका राजकीय नेत्याची भूमिका केली होती.
हे पण वाचा : हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा
समीर खक्कड यांचा मुलगा गणेश याने नवभारत टाईम्सला सांगितले की, मंगळवारी समीर खक्कड यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले मात्र नंतर बेशुद्ध पडले. मग तात्काळ डॉक्टरांना बोलवण्यात आले आणि त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले.
रुग्णालयात असताना त्यांची यूरिन पास होण्यास अडचण येत होती. यूरिनच्या समस्येमुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि नंतर हळूहळू त्यांचे मल्टिपल ऑर्गन फेल्यूअर होऊ लागले. त्यानंतर पहाटे 4.30 वाजता त्यांचे निधन झाले.
हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान
1996 मध्ये समीर खक्कड यांनी भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते. असं म्हटलं जात आहे की, त्यांनी अमेरिकेत गेल्यावर अभिनय सोडून जावा कोडर म्हणून नोकरी केली होती. मात्र, 2008 मध्ये त्यांची ही नोकरी सुटली असल्याचीही माहिती समोर आली.