Sania Mirza-Shoaib Malik divorce: 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एन्ट्रीमुळे झाला शोएब-सानियाचा घटस्फोट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बी टाऊन
Updated Nov 11, 2022 | 14:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sania Mirza-Shoaib Malik divorce: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सानियानेही आपल्या मुलासह शोएबचे घर सोडले आहे. कोणत्या मुलीच्या आयुष्यात येण्याने शोएबने सानिया मिर्झाला सोडले हे जाणून घेऊया.

Sania Mirza and Shoaib Malik divorce due to pakistani actress ayesha omar
'या' अभिनेत्रीमुळे शोएब-सानियाचा घटस्फोट?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे शोएब-सानियाचा घटस्फोट
  • आयेशा उमर पाकिस्तानी मॉडेल आहे
  • 2015 मध्ये आयेशाने 'कराची से लाहोर' या सिनेमातू पदार्पण केले

Sania Mirza-Shoaib Malik divorce: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सानियानेही आपल्या मुलासह शोएबचे घर सोडले आहे. कोणत्या मुलीच्या आयुष्यात येण्याने शोएबने सानिया मिर्झाला सोडले हे जाणून घेऊया. (Sania Mirza and Shoaib Malik divorce due to pakistani actress ayesha omar )

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पाकिस्तानी वृत्तानुसार दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे भेटले होते. दोघांनाही आपल्या मुलावर कोणत्याही प्रकारचा भार टाकायचा नाही.दोघेही मुलाच्या संगोपनाची काळजी घेत आहेत. आता दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सानियानेही आपल्या मुलासह शोएबचे घर सोडले आहे. कोणत्या मुलीच्या आयुष्यात येण्याने शोएबने सानियाला सोडले हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अधिक वाचा : समंथाचा 'यशोदा' सिनेमा सोशल मीडियावर लिक

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पाकिस्तानी मॉडेल आयेशा उमर शोएबच्या आयुष्यात आल्यापासून सानिया-शोएब या दोघांमध्ये मतभेद आहेत. शोएब आणि आयेशा अनेक प्रसंगांमध्ये एकत्र दिसले आहेत. जेव्हापासून सानियासोबत क्रिकेटरच्या घटस्फोटाची बातमी आली आहे, तेव्हापासून शोएब आणि आयेशाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटोशूट दोघांनी वर्षभरापूर्वी केले होते. या फोटोशूटनंतर शोएबने एका मुलाखतीत आयशाचे कौतुकही केले होते. शोएब म्हणाला होता की, आयेशाने मला शूटिंगदरम्यान खूप मदत केली. दुसरीकडे आयेशाबद्दल सांगायचे झाले तर, आयेशा एक अभिनेत्री आहे आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत तिचे खूप चांगले नाव आहे. ती पाकिस्तानमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक आहे. पाकिस्तानी वृत्तांवर विश्वास ठेवला तर आयेशा पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 'कुछ लम्हे जिंदगी के', 'दिल को मानना आया नही' आणि प्रसिद्ध पाकिस्तानी शो 'जिंदगी गुलजार है' मध्ये ती दिसली आहे.


आयेशाने 2015 मध्ये 'कराची से लाहोर'या सिनेमातून पदार्पण केले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला आता 12 वर्षे झाली. या लग्नातून दोघांना एक मुलगाही आहे. सानिया मिर्झा ही शोएबची दुसरी पत्नी आहे. सानिया मिर्झा आणि शोएबच्या लग्नाच्यावेळी शोएबच्या पहिल्या पत्नीनेही त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.

अधिक वाचा :  आम्ही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मात्र...विराटने लिहिले असे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी