अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला लिलावती रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sanjay Dutt
अभिनेता संजय दत्त  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल
  • श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्त रुग्णालयात दाखल
  • संजय दत्तची काही दिवसांपूर्वी कोविड टेस्ट करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आली होती

Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Actor Sanjay Dutt) याला लिलावती रुगणालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ६१ वर्षीय अभिनेता संजय दत्त याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीने केलेल्या ट्वीटनुसार, लिलावती रुग्णालयाच्या मते, संजय दत्तवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांचं एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. अभिनेता संजय दत्त याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आली होती. 

अभिनेता संजय दत्तने ट्वीट करुन म्हटलं आहे की, मी सर्वांना सांगू इच्छितो की माझी प्रकृती चांगली आहे. मी सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे आणि माझी कोविड-१९ टेस्ट निगेटिव्ह आली आहे. लिलावती रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने, उपचाराने मी एक दोन दिवसांत घरी असेल. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.

संजय दत्त अनेक प्रोजेक्ट्सवर करतोय काम

वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अभिनेता संजय दत्त याचा आधीचा सिनेमा पानीपत हा होता. सध्या संजय दत्तचे अनेक सिनेमा प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या सिनेमांच्या चित्रीकरणाचे काम रखडले आहे. यामध्ये सडक २, शमशेरा, भुज, केजीएफ २, पृथ्वीराज आणि तोरबाज यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

संजय दत्त भुज प्राइड ऑफ इंडिया सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवरही रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगन आणि अभनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा १९७१ च्या युद्धावर आधारित आहे.

यासोबतच अभिनेता संजय दत्त केजीएफ २ या सिनेमातही भूमिका करत आहे. या सिनेमात संजय दत्त एका खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक हा संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २९ जुलै रोजी रिलीज करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी