Trishala Dutt :संजय दत्तची मुलगी कुणाला करतेय डेट

बी टाऊन
Updated Apr 18, 2019 | 18:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sanjay Dutt daughter trishala dutt: अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नुकताच तिनं एक असा फोटो शेअर केलाय. त्यावरून ती कुणाला तरी डेट करतेय हे स्पष्ट होत आहे.

Trishala Datt
त्रिशाला दत्त  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडमध्ये आता एक नवी पिढी एंट्री घेतेय. आपल्या सर्व कलाकारांची मुलं-मुली फारच सोशल मीडिया ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळं या स्टार किड्सच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल लगेच माहिती मिळते. आपले आवडते कलाकार आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला म्हणूनच सध्या चर्चेत आलीय. तिनं आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोवरून ती कुणाला डेट करतेय हे समजून येत आहे.

त्रिशालानं आपल्या फोटोसोबत जे कॅप्शन लिहिलं आहे यातून ती सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळून येतंय. शिवाय तिचा बॉयफ्रेंड हा कुणी भारतीय नसून इटलीचा तरूण आहे, हे सुद्धा या फोटो आणि कॅप्शनवरून कळून येतंय. त्रिशालानं तिच्या फोटोवर कॅप्शन लिहिलंय की, ‘एका इटालियन व्यक्तीला डेट करायचं म्हणजे भरपूर पास्ता आणि वाईन.’ तिच्या या स्टेटसमुळं तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

dating an Italian means lots of pasta and lots of wine #carboverload #gymtomorrowtho #cantkeepeatinglikethis

A post shared by ? Trishala Dutt (@trishaladutt) on

 

आता सध्या अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे नंतर आता शाहरूख खानची मुलगी सुहाना सुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असं वाटतंय. ती नुकतीच वोग मॅगझिनसाठी फोटोशूट मध्ये एकदम हॉट अवतारात दिसतेय. त्रिशालाचेही अनेक हॉट फोटो आपल्याला तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. मात्र ती बॉलिवूडमध्ये येणार की नाही याबाबत अजून काही माहिती स्पष्टपणे कळली नाही आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

happy holidays ?????@duttsanjay

A post shared by ? Trishala Dutt (@trishaladutt) on

त्रिशाला संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. तिनं न्यूयॉर्कमधून लॉमध्ये शिक्षण घेतलं. यासोबतच तिला मॉडेलिंग आणि फॅशनचीही आवड आहे. संजय दत्तला तीन मुलं आहेत. मोठी त्रिशाला आणि तिसरी पत्नी मान्यताचे दोन जुळी मुलं.

त्रिशालाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरचे तिचे फोटो पाहिल्यावर हे लक्षात येतं की तिला फॅशनची आवड आहे. त्रिशाला इन्स्टाग्रामवर फार सक्रीय असून ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. ती अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चर्चेत राहते.

आता त्रिशालाचा तो इटालियन बॉयफ्रेंड कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Trishala Dutt :संजय दत्तची मुलगी कुणाला करतेय डेट Description: Sanjay Dutt daughter trishala dutt: अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नुकताच तिनं एक असा फोटो शेअर केलाय. त्यावरून ती कुणाला तरी डेट करतेय हे स्पष्ट होत आहे.
Loading...
Loading...
Loading...