Sanjay Dutt joins Hera Pheri 3, Great to be together with Akshay Kumar, Suniel Shetty, Paresh Rawal says Sanjay Dutt : बॉलिवूडच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये हेराफेरी या सिनेमाचा समावेश होतो. आतापर्यंत हेराफेरी आणि फिर हेरा फेरी आले आहेत. लवकरच हेरा फेरीचा तिसरा सिक्वल येत आहे. हा सिनेमा अर्थात हेरा फेरी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमाचे शूटिंग सुरू आहे.
अक्षय कुमार ऐवजी हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमात कार्तिक आर्यन दिसेल अशी आधी चर्च होती. पण आता अक्षय कुमार हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमात हे कन्फर्म झाले आहे. या पाठोपाठ आणखी एक बातमी कन्फर्म झाली आहे. संजय दत्त हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमात दिसणार आहे.
संजय दत्त अनेक हिंदी सिनेमांत दिसला आहे. पण डबल धमाल, मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई या सिनेमांतील संजय दत्तच्या भूमिका अनेकांच्या आजही लक्षात आहे. आता संजय दत्त हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमात दिसेल. या सिनेमात त्याची भूमिका व्हिलनची असल्याचे वृत्त आहे.
संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संजय दत्त बोलताना दिसत आहे. 'मी एका अप्रतिम सिनेमात काम करत असल्यामुळे आनंदात आहे. परेश, अक्षय आणि अण्णा (सुनिल शेट्टी) सोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे उत्साहात आहे' हे संजय दत्तचे वक्तव्य व्हायरल होत आहे.
संजय दत्त विरुद्ध राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनिल शेट्टी) आणि बाबूराव गणपतराव आपटे (परेश रावल) असा धमाल संघर्ष हेरा फेरी 3 या हिंदी सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.
Sushmita Sen : सुष्मिता सेनेला आला होता हार्ट अटॅक, झाली अँजिओप्लास्टी
मृत्यूच्या दाढेतून परतलेले सेलिब्रेटी