Sanjay Dutt House Photos: पाहा संजय दत्तच्या आलिशान घराचे 15 फोटोज

बी टाऊन
Updated Feb 05, 2021 | 15:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे पाली इथले हे घर अतिशय आलिशान आणि सुंदर आहे. आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत या घराच्या आतले काही फोटो.

Sanjay Dutt's house
अतिशय आलीशान आहे संजय दत्तचे पालीतील घर, पाहा या घराचे 15 फोटो 

थोडं पण कामाचं

  • मुंबईच्या पाली हिल परिसरात आहे संजय दत्तचे घर
  • पत्नी मान्यता आणि इकरा आणि शहरान या आपल्या मुलांसोबत राहतो संजय दत्त
  • पाहा त्यांच्या या घरातील काही सुंदर फोटो

बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) संजय दत्त (Sanjay Dutt) अतिशय चर्चेत असणारे नाव आहे. त्याने 1981मध्ये रॉकी (Rocky) या चित्रपटातून (film) पदार्पण (debut) केले आणि तो त्याचा पहिला गाजलेला चित्रपट होता. यानंतर त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने सुमारे 190 चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात रोमँटिक (romantic) ते विनोदी (comedy) असे सर्व चित्रपट आहेत. आज आम्ही आपल्याला त्याच्या सुंदर घराचे (house) फोटो (photos) दाखवणार आहोत.

पाली हिलमध्ये आहे संजय दत्तचे घर

संजय बांद्राच्या पाली हिलमधील आपल्या घरी कुटुंबासह राहतो. त्याची पत्नी मान्यता अनेकदा घराचे फोटो शेअर करते. या घरी संजयचे दिवंगत पिता नर्गिस आणि सुनील दत्त यांची मोठी छायाचित्रे आहेत. याशिवाय संजयचेही अनेक फोटो आणि कुटुंबाचे फोटोही आहेत.

संजयने केली आहेत तीन लग्ने

संजय दत्तच्या खासगी आयुष्यात खूप उतार चढाव आले. त्याने 1987मध्ये अभिनेत्री ऋचा शर्माशी विवाह केला होता. 1988मध्ये त्यांची मुलगी त्रिशलाचा जन्म झाला, पण 1996मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे ऋचाचे निधन झाले. नंतर 1998मध्ये त्याने मॉडेल रिया पिल्लईशी लग्न केले पण 2008मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2008मध्ये त्याने मान्यताशी विवाह केला आणि 2010मध्ये ते जुळ्या मुलांचे पालक झाले.

बॉलिवुडमध्ये काय करत आहे सध्या संजय दत्त?

संजय दत्त लवकरच केजीएफ: चॅप्टर 2 या चित्रपटात दिसणार आहे ज्यात तो प्रमुख भूमिकेत आहे. सोबतच रवीना टंडनही यात दिसणार आहे. गेल्या वर्षी संजयला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता ज्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन तंदुरुस्त होऊन त्याने पुनरागमन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी