Sanjay Gupta will make movie on Bar Dancer: वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवर संजय गुप्ता आणणार सिनेमा, अनेक गुपितं होणार उघड!

Sanjay Gupta's movie on Bar Dancer: मुंबईची वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवर निर्माता संजय गुप्ता सिनेमा करणार आहेत. या बायोपिकमध्ये अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे. सिनेमाचं दिग्दर्शन समित कक्कर करणार आहेत.

Sanjay Gupta's movie on Bar Dancer
वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवर बायोपिक येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईची बार डान्सर स्वीटीवर येणार बायोपिक
  • निर्माता संजय गुप्ता बनवणार सिनेमा, समित कक्करचं दिग्दर्शन
  • 2022 मध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे

Movie on bar dancer sweety: अनेक अप्रतिम आणि थरारक चित्रपट दिल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपट निर्माता संजय गुप्ता आणि दिग्दर्शक समित कक्कर वादग्रस्त बार डान्सर स्वीटीचा बायोपिक घेऊन येत आहेत. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.


'विस्फोट', 'काबिल', 'मुंबई सागा' यांसारखे चित्रपट बनवल्यानंतर आता चित्रपट निर्माते संजय गुप्ता आणखी एक वादग्रस्त चित्रपट आणणार आहेत. 
हा एक बायोपिक असेल, जो सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय बार डान्सर स्वीटीची कथा सांगेल. लिंग बदलून पुरुषापासून स्त्री झालेली बार डान्सर म्हणजेच स्वीटी. तिची कथा सांगणारा हा सिनेमा असणार आहे. 

काय असणार सिनेमात?


आमचे सहकारी टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्वीटीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव 'टोपाझ' असेल कारण दक्षिण मुंबईतील टोपाझ बारमध्ये तिने केलेल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित केले. हा सिनेमा 1980 आणि 1990 च्या दशकातील कथा सांगणार आहे, 
जेव्हा स्वीटी डान्स बारमध्ये होती. समित कक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्याचा 'इंदोरी इश्क' नावाचा अलीकडचा सिनेमा एमएक्स प्लेयरवर रिलीज झाला.


दोन वर्षांपूर्वीच अधिकार घेतले होते

वृत्तांवर विश्वास ठेवला तर संजय गुप्ताने एक-दोन वर्षांपूर्वी स्वीटीच्या बायोपिकचे अधिकार घेतले होते. त्यानंतर या प्रकल्पाचे कामही सुरू झाले होते. 
आता हा सिनेमा सध्या कास्ट केला जात आहे आणि 2022 च्या पूर्वार्धात मुंबई आणि आसपास शूटिंगला सुरुवात होईल. 

दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्याशी संवाद

आमचे सहकारी टाईम्स ऑफ इंडियाशी विशेष संवाद साधताना संजय गुप्ता म्हणाले, 'स्वीटीवर एक चित्रपट बनत आहे, या बातमीला पुष्टी मिळाली आहे. स्वीटीच्या कथेने एक उत्तम पटकथा म्हणून स्वतःला सादर केले आहे, हा एक मनोरंजक सिनेमा असेल याची मला खात्री आहे. सध्या आम्ही उर्वरित सिनेमावर काम करत आहोत.

त्याचवेळी दिग्दर्शक समित कक्कर म्हणाले, 'माझ्या आणि संजयसाठी हा एक पॅशन प्रोजेक्ट आहे. मी स्वीटीची प्रसिद्धी आणि फॅन्डम अनुभवली आहे. 
जेव्हा नर्तक प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांचे काय होते हे समजून घेण्यासाठी मी बरीच वर्षे घालवली आहेत. स्वीटीच्या माध्यमातून मी माझ्या शहरातील बार डान्सर्सचे जीवन मनापासून अनुभवले आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी