Sapna Choudhary dance video: सपना चौधरीच्या व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

बी टाऊन
Updated Apr 16, 2019 | 17:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sapna Choudhary dance video bol rasile: देशभरात आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध असलेली सपना चौधरी नुकतीच बिहारच्या स्टेजवर सर्वांना घायाळ करुन परतलीय. या कार्यक्रमाचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sapna Choudhari new viral video
सपना चौधरीचा डान्स व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई: सपना चौधरीच्या डान्सचे अनेकजण फॅन्स आहेत. मग ते बॉलिवूडचे कलाकार असो किंवा सामान्य तरुण-तरुणी. सपना जिथं जाते तिथं स्टेजवर आपल्या नृत्यानं आग लावून येते. काही दिवसांपूर्वी सपना चौधरी बिहारच्या धर्तीवर आपला जलवा दाखवून परत आली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर यूट्यूबवर चांगलाच व्हायरल झालाय. सध्या यूट्यूबवर सपना चौधरी नाव टाकताच तिचा एक व्हिडिओ सर्वात वर येतो ज्याचे शब्द ‘ताजमहल सी चमके गोरी... बोल रसीले’ हे आहेत. हा व्हिडिओ यूट्यूबवर आतापर्यंत १ कोटींहून जास्त वेळा पाहिला गेलाय.

बिहारमध्ये सपना चौधरीनं हा कार्यक्रम सादर केला तेव्हा तिथं लाखों प्रेक्षक उपस्थित होते. जशी सपना स्टेजवर आली आणि आपल्या ठुमक्यांनी तिनं सर्वांची पाऊलं उचलण्यास भाग केलं. सपना चौधरीचं हे गाणं यूट्यूबवर खूप वेळा बघितलं आणि पसंत केलं जातंय. यात ती निळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातलेली दिसतेय.

हरियाणाच्या रोहंतकमध्ये जन्म झालेल्या सपना चौधरीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. सपनानं बिग बॉसच्या ११व्या सिझनमध्ये ही नाव कमावलं होतं. तसंच तिनं बॉलिवूडमध्येही आपलं नाव बनवलं आहे. सपनानं अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत.

सपनानं संपूर्ण देशात नाव कमावलंय. आता तिनं फक्त हरियाणातच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशच्या नागरिकांनाही आपल्या गाण्यावर नाचण्यास भाग पाडलं आहे. आपल्या चाहत्यांसाठी सपना कधी फोटो तर कधी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप पसंत केले जातात.

सपना चौधरीच्या गाण्यांवर बॉलिवूड स्टार ही डांस करतांना आपण पाहतो. नुकताच अभिनेत्री सनी लिऑनीनं सपना चौधरीच्या गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तर बिग बॉस दरम्यान सपनानं सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत स्टेजवर ठुमके लगावले होते. तेव्हा सलमान-अक्षयच्या मुझसे शादी करोगे या गाण्यावर तिघांनी डान्स केला होता.

तर राखी सावंत सोबत सपनानं बॉक्सिंगच्या रिंगमध्ये केलेला डान्सही खूप पसंत करण्यात आला होता. त्यात सपना आणि राखी दोघींनीही जबरदस्त डान्स केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी