Sapna Choudhary Style: सपना चौधरीचा ग्लॅमरस लूक, शेअर केला पॅन्टसूटमधला फोटो

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Aug 04, 2019 | 16:58 IST

Sapna Choudhary Glamorous Look: सपना चौधरीला हल्लीच Delhiites Icon of the Year Entertainer Award मिळाला आहे. यावेळी तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला.

Sapna Choudhary
Sapna Choudhary Style: सपना चौधरीचा ग्लॅमरस लूक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सपना चौधरीचा ग्लॅमरस लूक
  • सपना चौधरीला Delhiites Icon of the Year Entertainer Award
  • सपना चौधरीचा भाजप पक्षात प्रवेश

Haryanvi Dancer Sapna Choudhary: हरियाणवी डान्सर सपना चौधरीला सगळेच ओळखतात. लोकल स्टेज शोमधून आपल्या करिअरची सुरूवात करणारी सपना आता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तिला केवळ हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येच ओळखत जात होता. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सपना घरा-घरात पॉप्युलर झाली आहे. तिचे ठुमक्यांचं बरेच दिवाने आहेत. सपनाच्या स्टेज शोसाठी खूप गर्दी होते असते. डान्सच नाही तर स्टाइलमध्येही सपना कोणापेक्षाही कमी नाही. 

सपनानं आपले काही स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. यात तिनं एक मस्टर्ज येलो पॅन्टसूटमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. सपनानं यावेळी एक व्हाईट डीप नेक टॉप कॅरी केला आहे. जे सपनानं हाय वेस्ट पॅन्ट आणि मॅचिंग ब्लेजरनी पेअर केलं आहे. सपनानं आपल्या लूकला चोकर आणि स्टड ईअररिंग्सनं एक्सेसराइज केलं आहे. मेकअपबद्दल बोलायचं झाल्यास, सपना डार्क लिपस्टिक आणि चीक्सवर हायलाइटरसोबत दिसत आहे. यावेळी तिनं सेंटर पार्टिंगसोबत स्ट्रेट लूकमध्ये आपले केस मोकळे ठेवले आहेत. सपनानं आपला लूक स्ट्रेपी हिल्सनं पूर्ण केला आहे. 

हे फोटोज एका इव्हेंटचे आहेत. जिथे सपनाला अवॉर्ड मिळाला आहे. याबाबत सांगताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'Delhiites Icon of the Year Entertainer Award'  मिळाला. सपनाचा हा ग्लॅमरस लूक तिच्या फॅन्सना खूप आवडला. यावर सपनाला ब्यूटीफूल, सुपर नाइस, स्मार्ट अशा प्रकराच्या कमेंट येत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#sapnachoudhary #sapnachaudhary

A post shared by DESI QUEEN (@isapnachaudhary) on

सपनानं आपल्या कुटुंबियांना आर्थिक रूपानं मदत करण्यासाठी खूप लहान असताना काम करण्यास सुरू केली होती. सपनानं बऱ्याच हरियाणवी म्युझिक व्हिडिओजमगध्ये काम केलं. काही दिवसांपूर्वी सपना फेमस पंजाबी सिंगर दलेर मेहंदीसोबत बावली तरेडमध्ये दिसली होती. या म्युझिक व्हिडिओमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळाला, जो स्वतः दलेरनं स्टाइल केला होता. 

सपना टीव्हीवरील फेमस रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये दिसली होती. यात तिचा अंदाज सर्वांनाच आवडला होता. शोमध्ये सपनानं हिना खानसोबत स्पेशल डान्स परफॉर्मेन्स देखील केला होता. सपना हा शो जिंकू शकली नाही, मात्र तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये जबरदस्त फायदा झाला. याचवर्षी सपनानं दोस्ती के साइड इफेक्ट्स या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. 

सपनाचा राजकीय प्रवेश गाजला

सपना चौधरी हिने जुलै महिन्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये  भाजपची सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आलं होतं.

dancer sapna

या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात सपना चौधरी यांनी उपस्थिती लावली आणि भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेशही केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी