Sara ali khan : दारूच्या नशेत सारा अली खानने केले 'हे'कृत्य, चाहते म्हणाले," सारा, तू सुद्धा..."

बी टाऊन
Updated Sep 23, 2022 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sara ali khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara ali Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये सारा अली खान गेटजवळ उभ्या असलेल्या वॉचमनला साराचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श झालेला दिसत आहे. अर्थात, साराने हे कृत्य मुद्दाम केलेले नसले, तरी नशेतही साराने असे वागू नये अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांकडून येत आहे.

Sara ali khan drunk video viaral
का होतेय सारा अली खान ट्रोल?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सारा अली खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • दारूच्या नशेत साराने केलेल्या कृत्यामुळे चाहते नाराज
  • सोशल मीडियावर सारा अली खान ट्रोल

Sara ali khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara ali Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये सारा अली खान गेटजवळ उभ्या असलेल्या वॉचमनला साराचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श झालेला दिसत आहे. अर्थात, साराने हे कृत्य मुद्दाम केलेले नसले, तरी नशेतही साराने असे वागू नये अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांकडून येत आहे. (Sara ali khan drunk touched gatekeeper in wrong way video viaral sara get troll on social media)

अधिक वाचा : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात महिला पितात जास्त दारू


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्यावरील संस्कारांमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सारा जेव्हा जेव्हा मीडियासमोर येते तेव्हा सगळ्यांना हात जोडून नमस्कार करते. सारा अली खानची ही स्टाईल इतकी फेमस आहे की लोकं त्याची कॉपीही करताना दिसतात. मात्र, आता साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे इंटरनेट यूजर्स साराला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओमध्ये सारा मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. सारा दारूच्या नशेतच एका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसत आहे. 
त्याच दरम्यान चुकीच्या पद्धतीने साराचा स्पर्ध गेटवरील वॉचमनला झालेला दिसत आहेत. हा व्हि़डिओ पाहून प्रेक्षक खूपच संतापले आहेत कारण, संस्कारी अशा साराकडून त्यांना ही अपेक्षा नव्हती. अर्थात, साराने हे कृत्य मुद्दाम केलेले नाही. मात्र, नशेतही साराने असे बेताल वागू नये अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांकडून येत आहे. 

अधिक वाचा : दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस 16 मध्ये दिसणार का?

सारा अली खानचे चाहते नाराज

सारा अली खानचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की सारा अली खान स्वत:ला सुसंस्कृत असल्याचे दाखवते पण प्रत्यक्षात ती इतर स्टार किड्ससारखीच आहे. एका चाहत्याने व्हिडिओच्या खाली कमेंट केली आहे, 'ती नशेत असताना असे कृत्य करते.. लाज वाटत नाही का?' तर दुसऱ्याने म्हटलंय, "सारा हे काय करतेय, तिला तर आम्ही संस्कारी समजत होतो" साराच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सवरून चाहते सारावर किती नाराज आहेत याचा आपण केवळ अंदाजच लावू शकतो. साराने दारूच्या नशेत जरी हे कृत्य केलेले असले तरी अशाप्रकारे साराने वागू नये असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. 

नेक्स्ट जनरेशनची सर्वात यशस्वी हिरॉईन आहे सारा अली खान

केदारनाथ या सिनेमातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर रोहित शेट्टीच्या सिम्बामध्येही ती रणवीर सिंगसोबत झळकली. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दोन्ही सिनेमा हीट होते. त्यामुळे आजच्या पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून सारा अली खानकडे पाहिले जाते. जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेपेक्षाही सारा अली खान प्रेक्षकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. तिच्या वागण्याने, बोलण्याने ती नेहमीच प्रेक्षकांचे, चाहत्यांचे मन जिंकत आलेली आहे. त्यामुळे साराच्या 'या' कृत्यामुळे चाहते तिच्यावर नाराज झालेले आहेत एवढं मात्र नक्की. 

अधिक वाचा :  शिल्पा शिंदेचा धमाकेदार Performance; पहा एक झलक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी