सारा आणि कार्तिकच्या गाण्याची सोशल मीडियावर कमाल!

बी टाऊन
Updated Jan 23, 2020 | 14:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

सारा अली खान आणि कार्तीक आर्यनचा 'लव आज कल' या चित्रपटातील 'शायद' या गाण्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या चित्रपटातील गाणं 'शायद' हे रोमॅंटिक आहे, त्यामुळे प्रेक्षकांची या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे

मुंबई: सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा 'लव आज कल' या चित्रपटातील 'शायद' या गाण्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या चित्रपटातील गाणं 'शायद' हे रोमॅंटिक आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे. तरूण वर्गाला हे गाणं खूपच भावलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही जणांनी याला पसंती दर्शविली तर काहींनी टीका सुध्दा केली आहे. 'शायद' हे गाणं सुप्रसिध्द गायक अरजित सिंग याने गायले आहे. अरजित सिंगच्या गाण्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, तसेच कार्तिक आर्यन आणि सारा यांच्या जोडीची कमाल, त्यामुळे या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे शब्द हे इरशाद कामील यांनी लिहिले आहे. 'लव आज कल' लव स्टोरीवर आधारित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटातील नवोदीत अभिनेत्री आरूषी शर्माच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. या गाण्यात कार्तिक आणि आरूषी या दोघांचे देखील काही सिन दाखवण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी