Sara Tendulkar and her bold photos : सोशल मीडियावर सारा तेडुलकर काही ना काही कारणांनी चर्चेत असते. तिची स्टायलिश आणि मोहक अदा साऱ्यांनाच भुरळ घालते. सोशल मीडियावर सारा नेहमीच अँक्टिव्ह असते, स्वत:चे वेगवेगळे फोटो ती नेहमीच शेअर करते. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar). मात्र, साराने आपली स्वत: ची अशी ओळख निर्माण केली आहे. साराचा फॅशन सेन्स अमेझिंग आहे. तिची स्टाईल खूपच रॉयल आहे.
सध्या सारा गोव्यात ख्रिसमस व्हेकेशनचा आनंद लुटत आहे. साराने तिच्या इन्स्टा अकाउंटवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. चेहऱ्यावर निखळ हास्य, आणि ती स्टाईल.. व्वा क्या बात है, असंच म्हणावं लागेल. साराने निळ्या रंगाचा वनपीस गाउन वेअर केला आहे. हातातील फुलांचा बुके, तितकाच सुंदर आहे जितकं साराचं सौंदर्य. हा फोटो शेअर करत साराने फोटोला कॅप्शन दिले आहे, Hello Goa. साराच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही चांगल्या कमेंट केल्या आहेत.
तर दुसऱ्या फोटोमध्ये ती डायनिंग टेबलवर बसली आहे. आणि जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. हा फोटो तिने शेअर केला आहे, आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे,
'Laughing because I saw the salad dressing' म्हणजेच 'मी हसत आहे , कारण मी सॅलेडचे ड्रेसिंग पाहिले आहे.
'साराने नुकतीच तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आहे. तिच्या मॉडेलिंगचेही फोटो तिच्या इन्स्टावर शेअर करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी सारा चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असंही म्हटलं जात होतं पण, सचिन तेंडुलकरने स्वत:च या अफवा असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.