Satish Kaushik Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूच्या कारणावरुन प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या धटक्याने झाले होते. मात्र, ज्या फार्म हाऊसवर त्यांनी पार्टी केली होती तेथे काही औषधं आढळून आली आहेत आणि काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचं बोललं जात आहे.
असे म्हटले जात आहे की, धूलिवंदनासाठी एका पार्टीचं फार्महाऊसवर आयोजन करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी काही औषधं आढळून आली आहेत. आता या प्रकरणात पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत. फॉर्म हाऊसवर आयोजित पार्टीत ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्या सर्वांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व पाहुण्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#SatishKaushikDeath | Party was organized at the farmhouse of an industrialist. Police is going through the guest list. The party was attended by an industrialist who is wanted in a case: Sources — ANI (@ANI) March 11, 2023
हे पण वाचा : तुमच्या राशीसाठी शुभ रंग कोणता? वाचा
या पार्टीच्या आयोजनात एक उद्योगपती सुद्धा सहभागी होता अशी माहिती समोर येत आहे.धूलिवंदनाच्या पार्टीनंतर रात्री उशिरा सतीश कौशिक यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना फार्म हाऊसवरुन गुरुग्राम येथे नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचं निधन झालं.
हे पण वाचा : या राशीच्या व्यक्तींचा प्रेम विवाह होण्याची शक्यता अधिक
फार्म हाऊसवर काही संशयास्पद औषधे सापडली असल्याची माहिती समोर आली आहेत. तर या प्रकरणात सतीश कौशिक यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट तसेच व्हिसेरा रिपोर्ट येण्याची वाट पोलीस पाहत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्ट आल्यावरच सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.