Satyamev Jayate 2 First Review : जॉन अब्राहम-स्टारर सत्यमेव जयतेवर समीक्षकांची टिप्पणी

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 25, 2021 | 17:17 IST

Satyamev Jayate 2 First Review: जॉन अब्राहम (John Abraham) स्टारर सत्यमेव जयते 2 उदया रिलीज होणार आहे. तत्पूर्वी समीक्षकांसाठी या सिनेमाचा प्रीमीयर शो करण्यात आला. पाहुया समीक्षकांनी सिनेमाला किती स्टार दिले आहेत.

Satyameva Jayate 2 Movie Review John Abraham
समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया, प्रेक्षकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सत्यमेव जयते 2 ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया
  • जॉन अब्राहम महत्त्वपूर्ण भूमिकेत, उदया थिएटर्समध्ये झळकणार
  • प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची सिनेमा मेकर्सना उत्सुकता

Satyamev Jayate 2 First Review: जॉन अब्राहम  (John Abraham) स्टारर सत्यमेव जयते 2 साठी फर्स्ट रिव्हूयू आले आहेत. आणि जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शित, सत्यमेव जयते 2 (Satyamev Jayate 2 ) उद्या म्हणजेच 25 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.(Satyamev Jayate 2 First Review to be released on 25th Nov 2021)


जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर करण्यात आला तेव्हा त्याला नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना जॉनचा भव्य आवाज आवडला, तर काहींनी अॅक्शन सीन्सचा अतिरेक केल्याबद्दल अभिनेत्यावर टीका केली. आता, काही व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षकांनी हा चित्रपट आधीच पाहिला आहे, त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे ते पाहूया.

Satyameva Jayate 2' first look posters: John Abraham is the next superhero  cop wielding tri-colour on his chest | Hindi Movie News - Times of India


रोहित जैस्वाल @rohitjswl01 

"डाय हार्ड अँक्शन प्रेमींसाठी हा सिनेमा बनवलाय, हार्डकोर अॅक्शन, टाळ्या योग्य संवाद, @TheJohnAbraham ची दमदार कामगिरी आणि हिट संगीत यामुळे हा चित्रपट "एक संपूर्ण पैसा वसूल आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा" @MassZaveri ने HATTRICK 3*/5 मारला ⭐️⭐️ #सत्यमेवजयते2."

John Abraham's 'Satyameva Jayate 2' averts clash with Salman Khan's  'Radhe'; film will now release on 'later date' | Hindi Movie News - Times  of India


सुमित कडेल @SumitkadeI

"मनोरंजन- मसाला आणि अॅक्शनची रोलर कोस्टर राईड. @TheJohnAbraham तिहेरी भूमिकेत उत्कृष्ट आहे, त्याचे ठळक संवाद आणि फाईट सीक्वेन्स प्रेक्षकांचा मन जिंकतील.   @MassZaveri दिग्दर्शन ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरू शकते.


शिव सत्यम @AsliShiva 

"#SatyamevaJayate2 (Hindi) #OneWordReview "Torture" 0.5⭐/5. या समीक्षकांनी चित्रपटाला फारच कमी स्टार दिले आहेत ." तथापि, यांनी त्याचे ट्विट हटवले आहे आणि लिहिले आहे की, "निर्मात्यांनी मला उद्या रिव्हूयू पोस्ट करण्यास सांगितले म्हणून मी ते हटवले आहे. परंतु मी उद्या संपूर्ण रिव्ह पोस्ट करेन."


अन्याय आणि सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्धच्या लढ्याभोवती हा चित्रपट फिरतो. पोलीस, राजकारण्यांपासून ते उद्योगपती आणि सामान्य माणसापर्यंत 
सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा या चित्रपटात शोध घेण्यात येणार आहे. आता काही समीक्षकांनी आणि व्यापार विश्लेषकांनी सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मात्र, उद्या थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, जॉन अब्राहमचा अभिनय प्रेक्षकांना भावतो का.

आपल्या अभिनयाने, लुक्सद्वारे आणि उत्तम शरीरयष्टीद्वारे जॉन अब्राहमने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचा स्व:ताचा मोठा चाहता वर्ग आहे. जॉनच्या अनेक चित्रपटांना चाहत्यांनी उचलून धरले आहे. अभिनयाचे विविध पैलू पार पाडत जॉनने मॉडेल ते आघाडीचा स्टार इथपर्यत मजल मारली आहे. शिवाय जॉनच्या अॅक्शन चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. जॉनने आपल्या शरीरयष्टीत मागील काही वर्षात जबरदस्त बदल केले आहेत. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. एरवी जॉन तसा वादांपासून दूर राहणे पसंत करतो. वैयक्तिक आयुष्यात त्याला साधे राहणेच आवडते. प्रत्येक चित्रपटात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा जॉनचा प्रयत्न असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी