KRK Son's Tweet : 'माझ्या वडिलांना वाचवा, त्यांचा जीव धोक्यात', KRK च्या मुलानं मागितली देवेंद्र फडणवीस, अभिषेक बच्चनकडे मदत

बी टाऊन
भरत जाधव
Updated Sep 10, 2022 | 07:44 IST

अभिनेता (Actor) आणि स्वयंघोषित सिनेसमीक्षक (Self-proclaimed cine critic) कमाल राशिद खान उर्फ कमाल राशिद खानला (Kamaal Rashid Khan) नुकताच एका प्रकरणात जामीन मिळाला. याचदरम्यान केआरकेचा मुलगा फैझल कमालने (Faisal Kamal) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter) केलेल्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. 'काही जणं माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत असल्याचा' दावा फैझलने केलाय.

KRK's life in danger, boy asks Devendra Fadnavis for help
KRK चा जीव धोक्यात, मुलाने देवेंद्र फडणवीसांकडे मागितली मदत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केआरकेला 30 ऑगस्टला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती.
  • 2021 मध्ये एका फिटनेस ट्रेनचा विनयभंग केल्याचा आरोप

मुंबई : अभिनेता (Actor) आणि स्वयंघोषित सिनेसमीक्षक (Self-proclaimed cine critic) कमाल राशिद खान उर्फ कमाल राशिद खानला (Kamaal Rashid Khan) नुकताच एका प्रकरणात जामीन मिळाला. याचदरम्यान केआरकेचा मुलगा फैझल कमालने (Faisal Kamal) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter) केलेल्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. 'काही जणं माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत असल्याचा' दावा फैझलने केलाय. आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी फैझलने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. ('Save my father, his life is in danger', KRK's son tweet; ask Devendra Fadnavis, Abhishek Bachchan for help)

माझ्या वडिलांना वाचवा - फैझल कमाल

फैझलने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, मी केआरकेचा मुलगा फैझल कमाल... 'मुंबईत काही जण माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत आहेत. मी 23 वर्षांचा असून मी शिक्षणासाठी लंडनला रहातो. त्यामुळे मी खूप चिंतेत आहे. मला कळत नाहीये मी त्यांची मदत कशी करू. मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांचा जीव वाचवण्याची विनंती करतो'.

Read Also : भाजपकडून 15 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती

सुशांतसिंह राजपूत सारखं... 

फैझल कमालने आणखी एक ट्विट केलं असून त्यात त्याने म्हटलंय... 'वडिलांशिवाय मी आणि माझी बहिण जगू शकत नाही. त्यांचं आयुष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या वडिलांचा सुशांत सिंग राजपूतप्रमाणे मृत्यू व्हावा अशी आमची इच्छा नाही. मी देशातील जनतेला विनंती करतो की, माझ्या वडिलांच्या आरोग्यासाठी मला पाठिंबा द्या'

ट्विटमुळे केआरकेला अटक

केआरकेला 30 ऑगस्टला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला मालाड पोलिसांनी अटक केली. एका प्रकरणात 2020 मध्ये राहुल कनाल यांनी केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात केआरकेला जामीन मिळाला. केआरकेने अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमावर ट्विट केलं होतं. त्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

Read Also : Zomato डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा

महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप 

चार दिवसांनी म्हणजे 3 सप्टेंबरला केआरकेला पुन्हा अटक करण्यात आली. 2021 मध्ये एका फिटनेस ट्रेनचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पाच दिवसांच्या तुरुंगवारीनंतर केआरकेला 8 सप्टेंबरला जामीन मिळाला.

काय म्हटलं होतं तक्रारीत

तक्रार करणाऱ्या महिलेनं सांगितलं की, केआरकेनं तिला कॅप्टन नवाब सिनेमात मुख्य भूमिका देण्याचं आश्वासन दिलं होतं. या सिनेमात तिच्याबरोबर इम्रान हाश्मी असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. परंतु असं झालंच नाही. उलट फोनवरून तो मला वाईट, अश्लिल भाषेत कॉमेन्ट करू लागला होता. घरी बोलवून केआरकेने तिच्यासोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्या महिलने दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी