पुष्पा-2चा टिझर पाहिला? आता जाणून घ्या अल्लू अर्जुनचं मानधन; प्रेक्षकांच्या मनावर Ruleकरण्याठी पुष्पानं किती घेतलं मानधन

बी टाऊन
भरत जाधव
Updated Apr 08, 2023 | 14:20 IST

अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर सुपरहिट चित्रपट पुष्पाचा दुसरा भाग पुष्पा: द रुलचा टीझर (Teaser) नुकताच रिलीज झाला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अल्लू अर्जुनची धमाकेदार स्टाईल पाहून चाहते आवाक झाले आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिझर पाहून चाहते धक्क झाले आहेत.

Seen the teaser of Pushpa 2? Know now Allu Arjun's fee
पुष्पा-2साठी अल्लू अर्जुनचं मानधन ऐकून येईल चक्कर   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पुष्पा: द रुल टीझर पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
  • भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
  • आर्या चित्रपट हा अल्लूच्या करिअरमधील टर्निंग पाईंट ठरला.

मुंबई :   अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर सुपरहिट चित्रपट पुष्पाचा दुसरा भाग पुष्पा: द रुलचा टीझर (Teaser) नुकताच रिलीज झाला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अल्लू अर्जुनची धमाकेदार स्टाईल पाहून चाहते आवाक झाले आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिझर पाहून चाहते धक्क झाले आहेत, त्यातील पुष्पाचा नवा लूक अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरला. पण मित्रांनो चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी पडद्यावरील पुष्पानं घेतलेलं मानधन ऐकून तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही.  (Seen the teaser of Pushpa 2? Know now Allu Arjun's fee; How much fee did  take Pushpa to rule the on audience?)

पुष्पा: द रुल टीझर पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. पुष्पा: द रुलच्या टिझरमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार झाल्याच आणि पुढे गायब झाल्याच दाखवलं आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या  वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्मात्यांनी पुष्पा 2 चित्रपटाची पहिली झलक दाखवली होती. त्याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यानंतर आता अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ट्रेलर रिलीज (Pushpa 2 Trailer) करण्यात आला. हिंदी भाषेत देखील चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

अधिक वाचा  : संकष्ट चतुर्थीला अशी करा बाप्पाची पूजा

हा टीझर पाहून अनेकजण थक्क झाले. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूकदेखील चाहत्यांना आवडला आहे. यात अभिनेता अल्लू अर्जुनने साडी घातली आहे. कानात झुमका आणि गळ्यात लिंबूची माळ घातली आहे. पुष्पाचा हा लूक पाहून तुम्ही थक्क झाला असाल यात शंका नाही. परंतु या चित्रपटासाठी अल्लु अर्जुनचं मानधन किती हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला 440 चा झटका लागल्याशिवाय राहणार नाही. 

अधिक वाचा  : वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा

आर्या या चित्रपटातील अल्लूच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सुकुमार रवी यांना तेजा किंवा प्रभासला चित्रपटात कास्ट करायचे होते, परंतु व्यस्त शेड्युलमुळे दोघांनीही चित्रपटात काम करण्यास नकार दिला, त्यानंतर अल्लूला चित्रपटात एंट्री मिळाली. अल्लू अर्जुन या चित्रपटात मुख्य भूमिकेत येण्यापूर्वी त्याने सहा महिने अॅनिमेटर आणि डिझायनर म्हणून काम केले. या दरम्यान त्याला दरमहा 3500 रुपये पगार मिळत होता.

अधिक वाचा  : झोपण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही असंख्य समस्यांना बळी पडू शकता

अल्लूला साऊथ सिनेमाचा मायकल जॅक्सन म्हटले जाते. सर्वोत्तम डान्स मूव्हजमुळे त्याला हे शीर्षक मिळाले आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा हा अल्लूच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याच चित्रपटाने अल्लूला संपूर्ण भारतातील स्टार बनवले. यासाठी त्याने सुमारे 40 कोटी रुपये शुल्क आकारले होते.

अधिक वाचा  : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम

अल्लूने सांगितले होते की, पुष्पाचा लूक मेक अप करण्यासाठी त्याला 2 तास लागायचे. त्याच वेळी, शूटिंगनंतर ते काढण्यासाठी बराच वेळ लागला. येत्या काही दिवसांत पुष्पा 2 चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.  दुसऱ्या भागासाठी त्याने 125 कोटी रुपये शुल्क आकारले आहे. या फीनंतर अल्लू संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी