स्वघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानने या अभिनेत्यावर उधळली स्तुतिसुमने

बी टाऊन
Updated Jun 07, 2021 | 11:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्वघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान हा गेल्या काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. सलमान खानच्या राधे चित्रपटावर त्याने टीका केली होती आणि सलमानवर इतरही आरोप केले होते. सलमानने त्याच्यावर दावा केला आहे.

Kamal R. Khan
स्वघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानने या अभिनेत्यावर उधळली स्तुतिसुमने  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • अर्जुन कपूर बॉलिवूडमधला खरा मर्द - केआरके
  • ट्वीट करून केआरकेने मानले अर्जुन कपूरचे आभार
  • कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे कमाल खान

मुंबई: स्वतःला चित्रपट समीक्षक (Film critique) म्हणवणारा कमाल आर खान (Kamal R. Khan) उर्फ केआरके (KRK) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल (controversial statements) प्रसिद्ध (famous) आहे. देशातल्या घटनांपासून ते बॉलिवूडमधल्या (bollywood) घराणेशाहीपर्यंत (nepotism) वेगवेगळ्या विषयांवर तो आपली मते (opinions) मांडत असतो आणि यामुळे त्याला सोशल मीडियावर (social media) ट्रोलही (troll) केले जाते. काहीच दिवसांपूर्वी त्याने बॉलिवूडचा भाई सलमान खानशी (Salman Khan) पंगा घेतला होता.

अर्जुन कपूर गेला केआरकेच्या मदतीला धावून

सलमान खानच्या राधे चित्रपटावर त्याने टीका केली होती आणि सलमान खानवर पैशांची अफरातफर केल्याचाही आरोप केला होता. यावर भडकलेल्या सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावाही ठोकला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता अर्जुन कपूरने आपली मदत केल्याचे कमाल खानने म्हटले आहे. अर्जुनने कमाल खानला फोन करून धीर दिला ज्यामुळे खुश होऊन केआरकेने त्याला बॉलिवूडमधला खरा मर्द असे म्हटले आहे.

ट्वीट करून केआरकेने मानले अर्जुन कपूरचे आभार

स्वतःच्या मदतीला आल्याबद्दल केआरकेने ट्वीट करून त्याचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले आहे, “खूप खूप आभार अर्जुन कपूर. तू मला फोन केलास आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल माझ्याशी चर्चा केलीस. तूच माझा खरा मित्र आहेस तू बॉलिवूडमधला खरा मर्द आहेस जो कोणालाही घाबरत नाही.” इतकेच नाही, तर कमाल आर खानने यापुढे अर्जुन कपूरच्या कोणत्याही चित्रपटावर टीका करणार नसल्याचेही म्हटले आहे.

कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे कमाल खान

सलमान खानवर केआरकेने केलेल्या आरोपांचे प्रकरण यावेळी चांगलेच पेटले आहे. सलमान खानच्या बीइंग ह्यूमन फाऊंडेशनवर त्याने केलेल्या आरोपांवरून सलमान खानने त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे आणि यामुळे कमाल आर खान कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. या परिस्थितीत बॉलिवूडमधील कोणीही त्याच्या मदतीला येण्यास तयार नसताना अर्जुन कपूरच्या कृतीमुळे के आर खान त्याच्यावर भलताच खुश झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी