Selfiee Twitter Review in marathi: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चा चित्रपट सेल्फी (Selfiee) 23 फेब्रुवारी 2023 ला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता चित्रपटाविषयी (movie) चाहत्यांनी आपली मते मांडण्यास म्हणजेच पब्लिक रिव्ह्यु येत आहेत. यावेळी हा पब्लिक रिव्ह्यू ( Public Review)ट्विटरवर (Twitter) आला असून यात अक्षय आणि इमरान यांच्या सेल्फीला फ्लॉप म्हणण्यात आलं आहे. तुर्तास हे पब्लिक रिव्ह्यु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त एक दिवस झाला आहे. (Selfiee Movie Twitter Review: 'Selfie' went bad on Twitter; Akshay gave back the flop movie? )
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
दरम्यान बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची मागील चार चित्रपट फ्लॉप झाले आहेत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि रामसेतुनंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'सेल्फी' घेऊन आपल्या फ्लॉप चित्रपटाचं सत्र तोडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सुरुवातीच्या काही पब्लिक रिव्ह्यूनुसार, अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट एक मोठा फ्लॉप ठरू शकतो. ट्विवटरवर या चित्रपटाविषयी चाहत्यांनी आपली मते मांडली आहेत.
अधिक वाचा :शाहरुख खानच्या मॅनेजरची कमाई पाहून व्हाल थक्क
चाहत्यांना या चित्रपटाकडून निराशा मिळाली आहे. चाहत्यांचे हे ट्विट पाहून अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माते नाराज होऊ शकतात. चित्रपट पाहून परतणारे बहुतेक प्रेक्षक सेल्फीचे कथानक आणि अक्षय कुमारच्या अभिनयाने निराश झाले आहेत. सेल्फी चित्रपटाबाबत चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटाबद्दल चाहत्यांचे रिव्ह्यू खूप वाईट मिळत आहेत. एका यूजरने ट्विट करत लिहिले की, 'आत्ताच सेल्फी पाहिला. हा बॉलिवूडमधील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमारचा अभिनय खूपच निराश करणारा आहे. इमरान हाश्मीने आपली भूमिका चांगली केली आहे. चित्रपटातील एकमेव चांगली गोष्ट म्हणजे मृणाल ठाकूरचा डान्स जे तुम्ही यूट्यूबवर फुकट पाहू शकतात, त्यामुळे तुमचे पैसे वाया घालवू नका. आणखी एका यूजरने लिहिले की, 'अक्षय कुमारचा 7 वा डिझास्टर चित्रपट'.
अधिक वाचा : प्रेमासाठी कुमार विश्वासनं घराच्यांसोबत केलं होतं भांडण
चित्रपटाचे बहुतांश रिव्ह्यू खराब येत आहेत तर काही युजर्सनी चित्रपटाचे कौतुकही केले आहे. एका यूजरने ट्विट करत लिहिले की, 'आत्ताच सेल्फी पाहिला. मला चित्रपट खूप आवडला. अनेक सीनने मला मोठ्याने हसवलं, तर अनेक सीनवर मला रडल्यासारखंही वाटलं. अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांना चांगलाच ओळखतो.
जर आपण चित्रपटाच्या ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या अंदाजानुसार चित्रपटाची कामगिरी खूपच थंड असणार आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी 7-10 कोटींची ओपनिंग मिळू शकते.