No Entry Sequel: 2005 साली बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि फरदीन खान (Fardeen Khan)स्टारर नो एन्ट्री हा चित्रपट रिलीज झाला होता. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि हा चित्रपट हिट ठरला. आता तब्बल 17 वर्षांनंतर स्पष्ट झाले आहे की 17 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल बनणार आहे, ज्यामध्ये त्याची मूळ स्टारकास्टच दिसणार आहे.
अनीस बज्मी सलमान खानच्या नो एंट्रीच्या सिक्वेलचे दिग्दर्शनही करणार आहेत. इंडिया टुडेशी बोलताना अनीस बज्मीने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल सांगितले, या चित्रपटात फरदीन खान आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. अनीसने खुलासा केला की, नो एंट्रीच्या सिक्वेलचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. अनीस बज्मी म्हणाले, 'लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मी सलमानला चार ते पाच वेळा भेटलो आहे आणि चित्रपट लवकरच सुरू करायचा आहे, असे सांगितले आहे. तो या चित्रपटाबाबत गंभीर असून आम्ही लवकरच त्याचे शूटिंग सुरू करणार आहोत.
अनीस बज्मीला चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल विचारले असता, सलमान व्यतिरिक्त फरदीन खान आणि अनिल कपूर देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे सांगितले. 17 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटात बिपाशा बसू, एशा देओल, लारा दत्ता आणि सेलिना जेटलीसारख्या अभिनेत्री होत्या. याआधी चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे चित्रपट तयार आहे आणि आता सलमानला तो कधी करायचा आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही
दुसरीकडे, वर्क फ्रंटवर, सलमान खान आयुष शर्मा आणि शहनाज गिलसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटात दिसणार आहे. तर अनिल त्याच्या पुढच्या 'थर' चित्रपटाची तयारी करत आहे, ज्यामध्ये तो मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.