‘Oh My God 2’ च्या क्रू मधील सात जणांना कोरोनाची लागण, शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी रद्द

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 13, 2021 | 18:33 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. पण आता पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

Seven of the crew of ‘Oh My God 2’ were infected with corona t
‘Oh My God 2’ च्या क्रू मधील सात जणांना कोरोनाची लागण  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • चित्रपटच्या क्रू मधील ७ सदस्यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह
  • ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भागा परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता
  • भूमिकेसाठी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची मागणी केल्याने निर्मात्यांनी परेश रावल यांना डच्चू दिला.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. पण आता पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे परत एकदा चित्रपटसुष्टीवर कोरोनाचे संकट ओढवले जाणार की काय अशी भीती वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘ओएमजी: ओ माय गॉड २’ चे शूटिंग पुढील दोन आठवड्यासाठी रद्द करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘ओएमजी: ओ माय गॉड २’ चे शूटिंग सुरू झाले होते. मात्र आता या चित्रपटच्या क्रू मधील ७ सदस्यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे .‘मिड-डे’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते आणि गेल्या पाच दिवसात ७ लोकांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे चित्रपटाचा निर्माता आश्विन वर्दे याने चित्रपटाचे शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी थांबवले आहे. कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि दिग्दर्शक अमित राय यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान, ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भागा परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेसृष्टीतील सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधील मुख्य भूमिकेसाठी परेश रावलच त्यांची पहिली पसंती होती. याबाबत निर्मात्यांनी त्यांच्याशी बातचीतदेखील सुरु केली होती. मात्र परेश रावल यांनी या भूमिकेसाठी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची मागणी केल्याने निर्मात्यांनी त्यांना नकार दिला अश्विनने या आधी ‘कबीर सिंग’, ‘नोटबुक’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्माती केली आहे. ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘देवा’च्या रुपात दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी