बॉलिवूडमध्ये सेक्स रॅकेट! अभिनेत्री आरती मित्तलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बी टाऊन
Updated Apr 18, 2023 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Actress Aarti Mittal Arrested: मनोरंजन क्षेत्रातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रॅन्चने मोठ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली आहे. आरती मित्तल असं अभिनेत्रीचं नाव असून ती लवकरच आर माधवनच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

aarti mittal arrested
बॉलिवूडमध्ये सेक्स रॅकेट! अभिनेत्री आरती मित्तलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सेक्स रॅकेट कथितरित्या कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवत होती. आरती मित्तल हिने दोन्ही मॉडल्सला देहविक्रीसाठी 15-15 हजार रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितलं.
  • क्राईम ब्रॅन्चला या प्रकाराबाबत एक टीप मिळाली होती. त्यानंतर एक सापळा रचण्यात आला. दोन डमी कस्टमर हॉटेलमध्ये पाठण्यात आले.
  • आरतीने मॉडल्स बदलण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली.  

Actress Aarti Mittal Arrested: मुंबई क्राईम ब्रॅन्चने (Mumbai Crime Branch) बॉलिवूडमध्ये वेश्या व्यवसाय अर्थात सेक्स रॅकेट (Sex Racket in Mumbai) चावलण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री आरती मित्तल (Actress Aarti Mittal ) हिला अटक केली आहे. क्राईम ब्रॅन्चच्या यूनिट 11 ने डमी कस्टमर पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. क्राईम बॅन्चने सोमवारी गोरेगाव येथे ही धडक कारवाई करत दोन मॉडल्सची सूटका देखील केली. 

सेक्स रॅकेट कथितरित्या कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवत होती. आरती मित्तल हिने दोन्ही मॉडल्सला देहविक्रीसाठी 15-15 हजार रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितलं. क्राईम ब्रॅन्चच्या पथकाने हॉटेलमध्ये डमी कस्टमर पाठवून सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. क्राईम ब्रॅन्चने आरती मित्तल हिला अटक केली असून दोन्ही मॉडल्सची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. 

असा केला भंडाफोड..

मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचला होता. पोलिसांनी 2 डमी कस्टमर हॉटेलमध्ये पाठवले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री आरती मित्तलशी संपर्क केला. आरतीने मॉडल्स बदलण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली.  

पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांनी सांगितलं की, क्राईम ब्रॅन्चला या प्रकाराबाबत एक टीप मिळाली होती. त्यानंतर एक सापळा रचण्यात आला. दोन डमी कस्टमर हॉटेलमध्ये पाठण्यात आले. तिथे आरतीशी संपर्क केल्यानंतर तिने दोन मॉडेल्स पाठलवते, असं सांगितलं. यासाठी तिने 60 हजार रुपयांची मागणी केली. 

अनेक मॉडल्सला ढकलंलं देहविक्रीच्या दलदलीत..

मुंबई पोलिसांना अभिनेत्री आरती मित्तल हिला अटक केली आहे. तिने पैशाचं आमिष दाखवून आतापर्यत मुंबईत आलेल्या अनेक मॉडल्सला देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याची माहिती मिळाली आहे. आरतीसोबत या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण गुंतलं आहे, याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत. 

आरती मित्तल ही अभिनेत्रीसोबत ती एक कास्टिंग डायरेक्टर देखील आहे. तिने 'अपनापन' सह अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलं आहे. इंडस्ट्रीतील ती लोकप्रिय अभिनेत्री आहे.  

आर माधवनसोबत दिसणार...

आरती मित्तल हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आरती लवकरच अभिनेता आर. माधवनसोबत चित्रपटात झळकणार असल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी