Box office Weekend: शुक्रवारी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या तापसी पन्नूचा शाबाश मिठू या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला आपली कमाल बॉक्स ऑफिसवर दाखवू शकलेला नाही. त्याचवेळी यासोबत रिलीज झालेला राजकुमार रावचा चित्रपटानेही फार काही विशेष कमाल दाखवलेली नाही.मात्र, राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा स्टारर 'हिट-द-फर्स्ट-केस' ने बॉक्स ऑफिसवर शाबाश मिठूपेक्षा जास्त कमाई केली. चला तर मग जाणून घेऊया, रिपोर्ट्सनुसार, दोन्ही चित्रपटांचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन किती आहे.
तसेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाबद्दलचे रिव्ह्यू कसे आहेत.
तापसी पन्नूचा बायोपिक चित्रपट शाबास मिठू बॉक्स ऑफिसवर फिका पडला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण 40 लाखांची कमाई केली. त्याचवेळी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा चित्रपटही मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत आहे. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे फारसे मनोरंजन केले नाही. मात्र, राजकुमारच्या हिट-द-फर्स्ट-केस या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटींचा गल्ला जमवला.
अधिक वाचा : MLAच्या चालकाचा प्रताप, टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात
दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली आहे. मिताली राजचा बायोपिक असलेला तापसीचा चित्रपट आता फ्लॉपच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्याचवेळी, राजकुमार आणि सान्याच्या चित्रपटाच्या दुस-या दिवशीच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत थोडी कमी आहे. पण तापसीच्या चित्रपटाची कमाई आणि त्यात खूप जास्त फरक आहे.
तापसी पन्नूच्या चित्रपटाच्या दुस-या दिवसाच्या कमाईचे आकडे सांगायचे झाले तर चित्रपट दुसर्या दिवशी केवळ 70 लाखांची कमाई करू शकला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत हा आकडा ठीक होता. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 5 कोटी रुपयांच्या कलेक्शनसाठी धडपडत आहे.
या दोन्ही चित्रपटांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण, चित्रपटाचा परफॉर्मन्स पाहून लोकांच्या पदरी निराशाच पडली. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. आता राजकुमार रावचा चित्रपट आपल्या कलेक्शनमध्ये काही सुधारणा दाखवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तापसी पन्नूचा चित्रपट भविष्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करेल की प्रेक्षकांची अशीच निराशा करेल? हे पाहायचं