[VIDEO] 'ह्या' भारतीय क्रिकेट कॅप्टनवर येणार सिनेमा

 भारतीय महिला क्रिकेट कॅप्टन मिताली राजच्या जिवनावर आधारीत बायोपीक येणार आसल्याच्या चर्चा अनेक दिवस चालू होत्या त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

'shabas mitthu' biopic based on the life of Indian women cricket captain Mithali Raj
'ह्या' भारतीय क्रिकेट कॅप्टनवर येणार सिनेमा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई:  भारतीय महिला क्रिकेट कॅप्टन मिताली राजच्या जीवनावर आधारीत बायोपिक येणार आसल्याच्या चर्चा अनेक दिवस चालू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिचा चित्रपट 'शाब्बास मिठ्ठू' ह्या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या चित्रपटात तापसी एका महिला क्रिकेटरच्या रूपात दिसत आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून कॅप्टन मिताली राज आहे.

या फर्स्ट लूक मध्ये तापसी हूबेहूब मिताली राजसारखी दिसत आहे. पोस्टमध्ये भारतीय महिला क्रिकेटचा युनिफॉर्म घातलेली तापसी पन्नू बॅटिंग करताना दिसत आहे. वायकॉम १८ स्टुडिओद्वारा निर्मित मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपट 'शाबास मिठ्ठू' पुढीच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी