शाहरूख खान आणि कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

Shah Rukh Khan And Katrina Kaif Tests Covid19 Positive : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Shah Rukh Khan And Katrina Kaif Tests Covid19 Positive
शाहरूख खान आणि कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शाहरूख खान आणि कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह
  • मुंबईत ५ मे २०२२ रोजी करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याची शक्यता
  • कतरिना, शाहरूख करणच्या पार्टीत सहभागी झाले होते

Shah Rukh Khan And Katrina Kaif Tests Covid19 Positive : मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याआधी अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता आदित्य रॉय कपूर या तिघांची कोरोना टेस्ट पण पॉझिटिव्ह आली. कोरोनाबाधीत झालेल्या बॉलिवूडच्या कलाकारांपैकी अक्षय कुमारच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. 

वेबस्टोरी : एंटरटेनमेंट

​खरं नाव सोडलं घेतलं शाहरुख नाव, पण प्रसिद्धी आली राहुलच्या नावानं

चाहत्यांनी सम्राट पृथ्वीराज चित्रपटात शोधली चूक

भूल भुलैया 2 करुन कार्तिक आर्यननं तोडले आपलेच विक्रम

मुंबईत करण जोहरच्या घरी ५ मे २०२२ रोजी पार्टी झाली. करणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याची शक्यता आहे. पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. या सेलिब्रेटींपैकी काही जणांना कोरोना झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पार्टीत सहभागी झालेल्यांची मुंबई मनपाचे अधिकारी चौकशी करत आहेत. कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि शाहरूख खान करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाले होते. 

अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. शाहरूख खानच्या जवान या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी