[PHOTOS] शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याचे खास फोटो तुमच्यासाठी

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 21, 2019 | 21:28 IST

शाहरूख खाननं 26,328.52 स्केअर फूटचा बंगला २००१ साली खरेदी केला होता. तेव्हा यांची किंमत जवळपास १३.३२ कोटी रूपये होती. आता या बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटी रूपये सांगितले जात आहे. 

shah rukh khan
[PHOTOS] शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याचे खास फोटो तुमच्यासाठी 

थोडं पण कामाचं

  • शाहरूख खानचा मन्नत बंगला २०० कोटींचा
  • गौरी खाननं डिझाईन केलं संपूर्ण घर
  • बंगल्यात आहेत सर्व सुविधा उपलब्ध

मुंबईः किंग खान या नावानं प्रसिद्ध असलेला बॉलिवूड एक्टर शाहरूख खान आपल्या फॅन्ससाठी एक बादशाहचं आहे. शाहरूख आपल्या फॅमिलीसोबत मुंबईत राहतो. शाहरूखचं घर मन्नत कोणत्याही राजमहलापेक्षा कमी नाही. सुरूवातीच्या दिवसात शाहरूख खान मन्नतच्या जवळच राहत होता. मात्र आज बांद्रामध्ये त्याचा स्वतःचा मन्नत बंगला आहे. सुरूवातीपासूनच शाहरूख खान महलासारखा दिसणारा बंगला खरेदी इच्छित होता आणि त्याच स्वप्न पूर्ण झालं. मन्नत मुंबईत राहणाऱ्या सुपरस्टारच्या सर्वांत पसंतीच्या घरांपैकी एक आहे. हे घर शाहरूख खानची पत्नी गौरी खानं स्वतः डिझाईन केला आहे. गौरीनं या घरातील प्रत्येक कानाकोपरा मोठ्या आलीशान पद्धतीनं डेकोरेट केला आहे. 

मन्नत एक थर्ड हेरीटेज स्ट्रक्चर असलेलं एक आहे. जे १९२० च्या दशकात बनवलं होतं. मन्नत आधी विला वियना या नावानं ओळखला जायचा. त्यानंतर शाहरूखनं हा बंगला आपल्या कुटुंबियांसाठी खरेदी केला आणि या सुंदर बंगल्याला मन्नत हे नाव दिलं. शाहरूख खानं 26,328.52 स्केअर फूटाचा हा बंगला २००१ साली खरेदी केला होता. तेव्हा या बंगल्याची किंमत १३.३२ कोटी रूपये होती. आता या बंगल्याची किंमत जवळपस २०० कोटी रूपये सांगितली जात आहे. 

शाहरूख खानच्या या बंगल्यात मल्टीपल एरिया आहे. ज्यात ५ बेडरूम, एक ग्रंथालय, जीम आणि अन्य सर्व काही आहे जे एक सेलेब कुटुंबाला शानदार लाईफस्टाईलसाठी गरजेचं असतं. एका मुलाखतीत गौरीनं म्हटलं होतं की, मी माझं घर बनवण्यासाठी ते प्रयत्न केले ते डोळे उघडणारं आणि इंटेसिव्ह होतं. हे घर सजवण्यासाठी खूप सर्चिंग, ट्रॅव्हलिंग आणि एडिटिंग लागली. तेव्हा जाऊन हे घर तसं दिसू लागलं आहे. 

शाहरूख खानचा ६ मजली सी-फेसिंग बंगला मन्नत बांद्रा वेस्टच्या बॅंडस्टॅंड येथे आहे. मन्नत बाहेरून इतका सुंदर आहे की, मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती एकदा तरी या बंगल्याच्या बाहेरून फोटो क्लिक करतोच. या कारणामुळे सुद्धा शाहरूखच्या घराबाहेर फॅन्सची मोठी गर्दी असते. काही वेळा शाहरूख आपल्या ब्लाकनीमध्ये येऊन फॅन्सना भेटतो सुद्धा. 

आतमधून मन्नतचं इंटिरिअर खूप भव्य पद्धतीनं तयार केलं आआहे. मन्नतच्या समोर एक सुंदर गार्डन आहे. जे घराच्या लूक आणखीन सुंदर बनवतो. मन्नतमध्ये काही वेळा शूटिंग साठी देखील वापरला जात होता. येथे सनी देओलचा सिनेमा नरसिम्हाचं क्लायमेक्सचं शूटिंग करण्यात आलं होतं. तसंच येथेच डेविड धवनचा गोविंदा स्टारर शोला और शबनमची सुद्धा शूटिंग झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी