'कावेरी अम्मा' च्या निधनावर भावूक झाला शाहरूख खान

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Feb 19, 2020 | 21:42 IST

Shah Rukh Khan tweet on Kishori Ballal Death: शाहरूख खानचा स्वदेश सिनेमातील कावेरी अम्मा म्हणजेच किशोरी बल्लाळ यांचं निधन झालं आहे. शाहरूख त्यांच्या निधनावर भावूक झाला आहे. 

Shah Rukh Khan With Swades actress Kishori Ballal
'कावेरी अम्मा' च्या निधनावर भावूक झाला शाहरूख खान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः  बॉलिवूडचा बाहशाह शाहरूख खानचा सिनेमा 'स्वदेश'मधील एक्ट्रेस कावेरी अम्मा म्हणजेच किशोरी बल्लाळ यांचं निधन झालं. मंगळवारी याबाबतच वृत्त समोर आलं होतं. सिनेमातील शाहरूखची भूमिका त्यांच्या खूप जवळची होती. शाहरूखनं किशोरी बल्लाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केलं आहे. 

किशोर अम्मा या गोष्टीवरून शाहरूखला ओरडायची 

शाहरुखनं ट्वीट करुन त्याची आठवण करून दिली आणि हा खुलासाही केला की, किशोरी बल्लाळ त्याला सिगरेट पिण्यावरून तंबी द्यायची. शाहरूखनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. किशोरी अम्मा यांची खूप आठवण येईल. खासकरून जेव्ही की त्या कशा मला सिगरेट पिण्यावरून ओरडायच्या. अल्लाह त्यांची काळजी घ्या.

स्वदेश डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांनी सुद्धा केलं ट्विट 

मंगळवारी स्वदेश सिनेमाचे डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट करून किशोर बल्लाळ यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, दुखःद किशोरी बल्लाळ यांच्या जाण्यानं खूप दुखी आहे. किशोरीजी तुम्ही आपल्या नम्र आणि साध्या व्यक्तिमत्त्वासाठी नेहमीच ओळखल्या जाल. स्वदेशमधला तुमचा कावेरी अम्माची भूमिका नेहमीच स्मरणात राहिल. 

किशोरी बल्लाळ गेल्या अनेक दिवसांपासून खूप आजारी होत्या. त्यांनी बंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. किशोरी बल्लाळ यांनी बॉलिवूड व्यतिरिक्त काही कन्नड सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्या एक ट्रेंड भरतनाट्यम डान्सर सुद्धा होत्या. 

स्वदेश 

स्वदेश सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, हा सिनेमा 2004 साली रिलीज झाली होती. यात शाहरूख नासाचा वैज्ञानिक मोहन भार्गव बनला होता. यावेळी किशोरी बल्लाळ यांनी शाहरूखच्या सुईन आई कावेरी अम्माची भूमिका साकारली होती. ज्यांना भेटण्यासाठी शाहरूख गावी येतो. बॉलिवूडमधला सर्वात चांगल्या सिनेमाच्या यादीत या सिनेमाचं नाव घेतलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी