शाहरूखच्या पठाण सिनेमावर 'कॉपी पेस्ट'चा आरोप

Shah Rukh Khan Pathaan Teaser Copied From Saaho War Tiger : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या 'पठाण' या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर बघून अनेकांनी शाहरूख खान आणि 'पठाण' सिनेमाच्या टीमवर 'कॉपी पेस्ट'चा आरोप केला. 

Shah Rukh Khan Pathaan Teaser Copied From Saaho War Tiger
शाहरूखच्या पठाण सिनेमावर 'कॉपी पेस्ट'चा आरोप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शाहरूखच्या पठाण सिनेमावर 'कॉपी पेस्ट'चा आरोप
  • 'पठाण' या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित
  • टीझरमधील दृश्य म्हणजे जुन्या सिनेातील दृश्यांची नक्कल असल्याचा आरोप

Shah Rukh Khan Pathaan Teaser Copied From Saaho War Tiger : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या 'पठाण' या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर बघून अनेकांनी शाहरूख खान आणि 'पठाण' सिनेमाच्या टीमवर 'कॉपी पेस्ट'चा आरोप केला. 

शाहरूखच्या 57व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार 2 नोव्हेंबर 2022 रोजी 'पठाण' या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या 1 मिनिट 25 सेकंदांच्या टीझरमध्ये अनेक जुन्या हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सिनेमांतील दृश्यांची नक्कल करण्यात आली आहे, असा आरोप अनेक सिनेमाप्रेमींनी केला. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि ग्राफिक्स व्हायरल होत आहेत. या व्हिडीओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून सिनेमाप्रेमींनी 'पठाण' सिनेमाच्या टीझरमध्ये नक्कल केलेल्या अनेक दृश्यांची माहिती दिली. सिनेमाप्रेमींनी सोशल मीडियावरून 'पठाण' सिनेमाच्या टीझरचा जाहीर पंचनामा सुरू केला आहे. 

अनेकांनी शाहरूख खान तसेच 'पठाण' सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे टीका सुरू केली आहे. नवनिर्मिती करणे जमत नाही आणि कॉपी पेस्ट करताना चोरी लपवणेही जमत नाही, अशा स्वरुपाचा आरोप सिनेमाप्रेमींनी 'पठाण' सिनेमाचा टीझर बघून केला आहे. 

'पठाण' सिनेमाच्या टीझरमध्ये 'वॉर', 'टायगर', 'कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांच्या निवडक दृश्यांची नक्कल करण्यात आली आहे, असा आरोप सिनेमाप्रेमी सोशल मीडियाद्वारे करत आहेत. 

Salman Khan च्या जिवाला धोका, महाराष्ट्र सरकारने पुरवली Y+ सिक्युरिटी

shah rukh khan: शाहरुख खान जूनियर कसा साजरा करणार किंग खानचा बर्थडे? जाणून घ्या पूर्ण प्लान

कॉपी पेस्टचा आरोप

'कॅप्टन अमेरिका: द विंटर सोल्जर' सिनेमात सॅबेस्टियन स्टॅनने केलेल्या एन्ट्रीसारखी एन्ट्री 'पठाण' सिनेमात जॉन अब्राहमने केल्याचा आरोप सिनेमाप्रेमी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी