Kabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार

बी टाऊन
Updated Jun 25, 2019 | 19:52 IST

Shahid Kapoor Kabir singh: शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमा पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र वादविवादामुळे हा सिनेमा नव्या अडचणीत सापडला आहे. एका डॉक्टरानं या सिनेमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

Kabir Singh movie Still
Kabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार  |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग गेल्या आठवड्यात रिलीज झाला. या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आणि हा सिनेमा शाहिद कपूरच्या करिअरमधला सर्वांत मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या कलेक्शनमध्ये बरीच वाढ होताना दिसतेय. मात्र या सिनेमासाठी प्रेक्षकांकडून संमिश्र रिव्यू मिळत आहेत. या सिनेमात शाहिद हा एक मद्यपी डॉक्टर दाखवण्यात आला आहे, ज्याला मेडिकल स्टुंडटवर प्रेम होतं. कबीर सिंग हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर वादात अडकला आहे. आता आणखी एका अडचणीचा सामना या सिनेमाला करावा लागत आहे. 

डॉक्टर्संची प्रतिमा बिघडवल्याचा आरोप

मुंबईच्या एका डॉक्टरनं कबीर सिंगच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण या सिनेमात डॉक्टर्संचं चुकीचं रूप दाखवण्यात आलं आहे. सिनेमात शाहिदचं ब्रेक अप झाल्यानंतर तो एक मदयपी डॉक्टर होतो. आपलं दुःख कमी करण्यासाठी तो स्मोकिंगपासून ड्रग्सपर्यंतचा वापर करतो. यासोबतच त्याला खूप रागीट आणि हिंसक दाखवण्यात आलं आहे. जो आपलं प्रेम जे प्रीतीवर असते ते पुन्हा परत मिळवायचं असतं. 

मुंबईच्या डॉक्टरनी लिहिलं पत्र 

मुंबईच्या डॉक्टरनं हे पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय आणि सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांना देखील पत्र लिहिलं आहे. या पत्रात कबीर सिंग या सिनेमाची स्क्रिनिंग थांबवण्यासाठी सांगितलं आहे. मुंबईच्या या डॉक्टरनुसार, सिनेमात एका डॉक्टरची प्रतिमा खराब केली आहे. तक्रारीत म्हटलं की, डॉक्टरांची प्रतिमा वाईट  आणि नेगेटिव्ह पद्धतीनं सिनेमात दाखवली आहे. 

इतक्या कोटींची कमाई 

शाहिदला रागीट डॉक्टर, ऑब्सेस्ड लव्हर म्हणून दाखवल्यानंतर टीका होत आहे. मात्र असं असलं तरी, कबीर सिंग हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात हिट ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमानं जवळपास ८८.३७ कोटी रूपयांचा बिजनेस केला आहे. सिनेमाच्या कथेवरून जरी वाद होत असले तरी शाहिदच्या अभिनयाचं जबरदस्त कौतुक केलं जातं आहे. या सिनेमातील शाहिदचा अभिनया आतापर्यंतचा सर्वांत बेस्ट अभिनय मानला जात आहे. 

कबीर सिंगच्या अपोझिट कियारा आडवाणी आहे. या सिनेमात कियारानं सुद्धा एक सामान्य मुलीची भूमिका केली आहे. हा सिनेमा साऊथ इंडियन सिनेमा अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Kabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार Description: Shahid Kapoor Kabir singh: शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमा पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र वादविवादामुळे हा सिनेमा नव्या अडचणीत सापडला आहे. एका डॉक्टरानं या सिनेमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola