OTT Web series Release This Week : शाहिद कपूर- काजोल ओटीटीवर करणार कमाल; या आठवड्यात प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट अन् वेबसीरिज

बी टाऊन
भरत जाधव
Updated Feb 10, 2023 | 15:05 IST

OTT Web series Release This Week: गेल्या दोन तीन आठवड्यापासून पठाणने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणलं आहे. अशात आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मही प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सज्ज झाले आहे. प्रत्येक आठवड्यात नव-नवीन वेबसीरिज (webseries) आणि चित्रपट (movie) प्रदर्शित होत आहेत.  

web series will be released on OTT this week
ओटीटीवर या आठवड्यात प्रदर्शित होणार हे धमाकेदार web series   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वेबसीरिजमधून शाहिद कपूर ओटीटी प्लॅटफॅार्मवर पदार्पण करत आहे.
  • हंसिका मोटवानीच्या लग्नावर अधारित शो लव, शादी और ड्रामा 10 तारखेला डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
  • 'शिव शास्त्री बल्बोआ' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

OTT Web series Release This Week :  बॉलिवूड (Bollywood) चाहत्यांसाठी हे वर्ष जबरदस्त मनोरंजन (Entertainment) करणारं आहे. 25 जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘पठाण’ (Pathan) ने देशासह जगभरात आपला डंका वाजवला असून कमाईचे नवीन विक्रम केले आहेत. गेल्या दोन तीन आठवड्यापासून पठाणने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणलं आहे. अशात आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मही प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सज्ज झाले आहे. प्रत्येक आठवड्यात नव-नवीन वेबसीरिज (webseries) आणि चित्रपट (movie) प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात ही अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत, याची यादी आपण जाणून घेणार आहोत...  (Shahid Kapoor- Kajol on OTT; These blockbuster movies and webseries will release this week)

अधिक वाचा  : दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...

फर्जी 

क्राइम आणि थरार असलेली ही वेबसीरिज 10 फेब्रुवारीला अॅमेझॉनवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमधून शाहिद कपूर ओटीटी प्लॅटफॅार्मवर पदार्पण करत आहे. या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूरबरोबर विजय सेतुपती, राशी खन्ना आणि केके मेनन सारखे दिग्गज अभिनेते दिसणार आहेत. 

अधिक वाचा  : या लोकांच्या प्रेमात वेडी झाली होती नोरा; प्रियकरांची आहे लंबी लिस्ट

लव, शादी और ड्रामा

‘कोई मिल गया’फेम हंसिका मोटवानीचं मागील वर्षी लग्न झालं होतं. हे तिचं लग्न खूप चर्चेत राहीलं होतं.  आता तिचं लग्न एका रिऑलिटी शोमध्ये रुपांतरीत झालं आहे.  हंसिका मोटवानीच्या लग्नावर अधारित शो लव, शादी और ड्रामा  10  तारखेला डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

 सलाम वेंकी 

काजोलचा चित्रपट  सलाम वेंकी डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. 9 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ओटीटी प्लॅटफॅार्म जी5 वर हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

अधिक वाचा  : रुपाली भोसलेचं 'रेड हॉट' रुप पाहून चाहते घायाळ

योर प्लेस ओर माइन

योर प्लेस ओर माइन ही एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट लॉन्ग- डिस्टेंस लवर्सच्या कथेवर अधारित आहे. या चित्रपट नेटफ्लिक्सवर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.  

शिव शास्त्री बल्बोआ

नीना गुप्ता आणि अनुपम खेर यांचा 'शिव शास्त्री बल्बोआ' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नर्गिस फाखरी आणि जुगल हंसराज देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी