Kiss च्या प्रश्नावरुन शाहिद कपूर भडकला आणि रिपोर्टरला म्हणाला...

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 15:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ऑनस्क्रिन किस च्या प्रश्नावरुन प्रश्न विचारला आणि...

Shahid Kapoor and Kiara Advani
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद पूर याच्या आगामी 'कबीर सिंग' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलर प्रक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचं दिसत आहे. ट्रेलर लॉन्च होताच सोशल मीडियातही चर्चेचा विषय बनला. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा अभिनय सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहे. सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी शाहिद कपूर, कियारा अडवाणी आणि निर्माता उपस्थित होते. याच दरम्यान असं काही झालं की शाहिद कपूर संतापला.

ट्रेलर लॉन्च दरम्यान शाहिद कपूर आणि कियारा या दोघेही प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना हसत-हसत उत्तरं देत होते. त्याचवेळी प्रधारमाध्यमांतील एका प्रतिनिधीने अभिनेत्री कियारा हिला प्रश्न विचारला की, सिनेमात शाहिद आणि तुमचे एकूण किती किसिंग सीन आहेत? यानंतर कियाराने रिपोर्टरच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं की, नेमके किस किती आहे हे मी मोजले नाही. यानंतर सुद्धा पुन्हा रिपोर्टरने कियाराला तोच प्रश्न विचारला आणि मग शाहिद कपूर भडकला.

 

अभिनेता शाहिद कपूरने रिपोर्टरच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, 'तुला गर्लफ्रेंड नाहीये का? तुम्ही किस व्यतिरिक्त इतर दुसरा प्रश्न विचारु शकत नाहीत का? आम्ही सिनेमात खूप अभिनय सुद्धा केला आहे'. या सिनेमातील ट्रेलरमध्ये सिगारेट, दारू, ड्रग्जची दृष्य दाखवण्यात आली आहेत. या प्रश्नावरुन शाहिद कपूरला प्रश्न विचारला असता त्याने सांगितले की, सिनेमात दारू आणि सिगारेटचा वापर केवळ स्टोरीतील पात्राचं दु:ख सांगण्यासाठी आहे आणि प्रेक्षकांनी या गोष्टींकडे बिल्कुल आकर्षित होऊ नये.

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी पहिल्यांदाच सिनेमात एकत्र काम करत आहेत. यापूर्वी म्युझिक व्हिडिओ 'उर्वशी' मध्ये दोघे एकत्र दिसले होते. अर्जुन रेड्डी या तेलुगू सिनेमाचा रिमेक हा सिनेमा आहे. अर्जुन रेड्डी सिनेमात विजय देवराकोंडा मुख्य भूमिकेत होता. कबीर सिंग या सिनेमाचे डायरेक्टर संदीप वांगा असून सिने १ स्टूडिओज आणि टी-सीरिजद्वारा सिनेमाची निर्मिती करण्यात आळी आहे. हा सिनेमा २१ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Kiss च्या प्रश्नावरुन शाहिद कपूर भडकला आणि रिपोर्टरला म्हणाला... Description: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ऑनस्क्रिन किस च्या प्रश्नावरुन प्रश्न विचारला आणि...
Loading...
Loading...
Loading...