Shahid Kapoor Movie : शाहिद कपूरने 'जर्सी'साठी कमी केली फी, जाणून घ्या किती कोटींमध्ये केले काम

Shahid Kapoor cut the fees for Movie : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर स्टारर फिल्म जर्सी 31 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी शाहिदने त्याची फी कमी केल्याचे वृत्त आहे. जाणून घ्या या चित्रपटासाठी शाहिदच्या फीबद्दल.

Shahid Kapoor reduced fees for 'Jersey' movie
शाहिद कपूरने 'जर्सी'साठी 8 कोटी फी कमी केली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शाहिद कपूरने जर्सी चित्रपटासाठी आपली फी कमी केली आहे.
  • 'जर्सी'मध्ये शाहिद कपूरसोबत अभिनेता मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे.
  • शाहिदचे वडील आणि अभिनेता पंकज कपूरसुद्धा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

Shahid Kapoor reduced the fees for Movie Jersey :बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट जर्सी 31 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होत आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. साऊथचा रिमेक असलेल्या या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच शाहिद कपूरचे वडील आणि अभिनेता पंकज कपूरही या चित्रपटात आहेत. शाहिदच्या या चित्रपटाचे शूटिंग कोरोना व्हायरसमुळे रखडले होते, मात्र, आता हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

शाहिद कपूरने इतकी कोटींची फी कमी केली


शाहिदने या सिनेमासाठी आपली फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहिदने चित्रपटासाठी 33 कोटी रुपये फी मागितली होती तसेच त्याने चित्रपटाच्या नफ्यात आपला वाटाही मागितला होता आणि निर्मात्यांनी अभिनेत्याच्या या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि कोविडमुळे त्याचे बजेटही बदलले. निर्मात्यांनी शाहिदला फी कमी करण्यास सांगितले, त्यानंतर अभिनेत्याने त्याची फी 8 कोटींनी कमी केली आणि चित्रपटासाठी 25 कोटी रुपये घेतले. मात्र, शाहिदला मिळालेल्या नफ्याच्या शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


साऊथ सिनेमाचा रिमेक


शाहिद कपूरचा चित्रपट जर्सी हा साऊथच्या लोकप्रिय चित्रपट जर्सीचा हिंदी रिमेक आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, ज्यामध्ये क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. 
राजकारणामुळे खेळाडू क्रिकेट कसा सोडतो हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. क्रीडा कोट्यातून मिळालेली नोकरीही जाते. त्याचा सात वर्षांचा मुलगा जर्सीची विनंती करतो आणि तो पैशांची व्यवस्था करण्यासाठी आणि जर्सी खरेदी करण्यासाठी तो पुन्हा मैदानात परततो. 

 या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे चित्रपटाची कथा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर्सी हा चित्रपट भारतीय संघाचा माजी क्रिकेटर रमण लांबा यांच्या जीवनावर आधारित आहे. रमण लांबा यांनी भारतासाठी चार कसोटी आणि ३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1998 मध्ये ढाका क्लब क्रिकेट सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली. सुरुवातीला ही दुखापत गंभीर नव्हती, मात्र अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी