Jersey: ‘कबीर सिंग’रिलीजनंतर शाहीद कपूर भिकाऱ्यांसारखा काम मागत फिरत होता, सांगितला अनुभव

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 24, 2021 | 19:16 IST

Jersey: शाहीद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक.. 2019 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी कबीर सिंग एक होता. हा चित्रपट लोकांमध्ये प्रचंड हिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकची कमाई केली. दोन वर्षांनंतर, शाहीद कपूर ‘जर्सी’ या आणखी एका रिमेकसह परतला आहे.

Shahid Kapoor's shocking experience after the release of 'Kabir Singh'
शाहिद कपूरचा 'जर्सी' डिसेंबरमध्ये येणार, ट्रेलर लॉन्च  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'कबीर सिंग'नंतर शाहिद 'जर्सी'सह रेडी
  • शाहिद कपूरचा जर्सी डिसेंबरमध्ये होणार रिलीज
  • शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत


Jersey: शाहीद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक.. 2019 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी कबीर सिंग एक होता. 
हा चित्रपट लोकांमध्ये प्रचंड हिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकची कमाई केली. दोन वर्षांनंतर, शाहीद कपूर ‘जर्सी’ या आणखी एका रिमेकसह परतला आहे.


जर्सी या नवीन चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी, शाहिद म्हणाला की कबीर सिंग त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता, हा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता कारण तो कधीही 250 कोटी रुपयांच्या चित्रपटांचा भाग नव्हता. शाहीद म्हणाला, "कबीर सिंग रिलीज झाल्यानंतर, मी सर्वांसमोर भिकाऱ्यासारखा गेलो. मी त्या सर्व लोकांकडे गेलो ज्यांनी 200-250 कोटींचे चित्रपट केले आहेत. मी या क्लबचा कधीच भाग नव्हतो, त्यामुळे ते पूर्णपणे माझ्यासाठी नवीन होते. फिल्म इंडस्ट्रीत 16-16 वर्षे घालवल्यानंतर, एवढी मोठी कमाई कधीच झाली नव्हती. त्यामुळे, शेवटी जेव्हा हे घडले तेव्हा मला कुठे जायचे हेच कळत नव्हते, हे सर्व माझ्यासाठी नवीन होते."


‘जर्सी’ हा चित्रपट का स्वीकारण्यामागचं कारण सांगताना शाहिद म्हणाला, की या मूळ चित्रपटातील नानीची भूमिका पाहून माझं रडूच थांबत नव्हतं. "मी 18 वर्षे काम करत आहे आणि शेवटी माझ्या एका चित्रपटाने इतका मोठा व्यवसाय केला. कबीर सिंग नंतर पुढे काय करावे, या विचाराने मी खूप अस्वस्थ होतो. काहींनी मला कॉलेजमधील मुलाची भूमिका करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी मला आक्रमक भूमिकांवर भर देण्यास सांगितले. जेव्हा मी ही कथा ऐकली तेव्हा ती माझीच राहिली. कबीर सिंग रिलीज होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला आणि मी अक्षरश: ओक्साबोक्शी रडलो. यावेळी माझ्यासोबत हा चित्रपट पाहणारे मीरा आणि मॅनेजर माझ्याकडे पाहत राहिले" जर्सीच्या ट्रेलर लाँचच्या वेळी शाहिदने हा प्रसंग शेअर केला. 

तो पुढे म्हणाला, "तुम्ही म्हणू शकता,  हा चित्रपट न करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळे,  हा चित्रपट करण्यासाठी माझी वाट पाहणारा आणि माझ्यासोबत मेहनत करणारा डायरेक्टर गौतम तिन्ननुरीला सर्व श्रेय जातं. आणि मला गर्व आहे की मी हे काम केलं. मी छातीठोकपणे म्हणू शकतो की हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे."


गौतम तिन्ननुरीनेही शाहीदचे कौतुक केले आणि म्हणाला, "माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहीद कपूरसोबत काम करणे. कबीर सिंगच्या प्रचंड यशानंतरही त्याच्यात किंचितसाही बदल झालेला नाही. तो पूर्णपणे चित्रपटाची कथा आणि पात्राशी समरस झाला होता. 
त्याच्यासोबत काम करणं हे खूप समाधान देऊन गेलं"

जर्सी एका निवृत्त क्रिकेटपटूच्या भोवती फिरणारी कथा आहे, ज्याला त्याच्या मुलाचे जर्सी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. या चित्रपटात शाहीदसोबत मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी ‘जर्सी’ रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी