Dilwale Dulhania Le Jayenge: 27 वर्षांनंतरही 'DDLJ'ची जादू कायम, शाहरुख-काजोलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

बी टाऊन
Updated Nov 03, 2022 | 17:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dilwale Dulhania Le Jayenge box office collection Day 1 : शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि काजोलची (Kajol) प्रमुख भूमिका असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) या सिनेमाची जादू आजही कायम आहे. 27 वर्षांनी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात आला. हा सिनेमा पाहण्यासाठी लाखो चाहते जमले होते. सिनेमाचे पहिल्या दिवशीचं कलेक्शन थक्क करणारं आहे.

shahrukh and kajol starrer Dilwale Dulhania Le Jayenge box office Day 1 collection
27 वर्षांनंतरही 'DDLJ'चा करिष्मा कायम 
थोडं पण कामाचं
  • शाहरुख-काजोलची जादू आजही कायम
  • 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
  • बॉक्स ऑफिसवर सिनेमाने कमावले 25 लाख रुपये

Dilwale Dulhania Le Jayenge box office collection Day 1 :  1995 मध्ये रिलीज झालेला बहुचर्चित रोमॅण्टिक ड्रामा आजही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झालेला आहे. आदित्य चोप्रा निर्मित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) या सिनेमाची जादू आजही कायम आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्या नव्या सिनेमाचा टीझर लाँच करण्यासाठी'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'या सिनेमाचं निवडक शहरांमध्ये स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोलची (Kajol) जादू प्रेक्षकांवर आजही कायम आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई केली आहे. (shahrukh and kajol starrer Dilwale Dulhania Le Jayenge box office Day 1 collection) 

अधिक वाचा : 'पठाण' सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी

सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. हा सिनेमा PVR, INOX आणि Cinépolis इथे पुन्हा रिलीज करण्यात आला. सिनेमाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. तब्बल 27 वर्षांनंतरही सिनेमाची जादू कायम आहे. सिनेमाने तब्बल 25 लाखांची कमाई केलेली आहे. शाहरुख आणि काजोल यांची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना खूप आवडते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Yash Raj Films (@yrf)

यावेळी सिनेमाच्या तिकीटाचे दरही कमी ठेण्यात आले होते. 112 रुपयांमध्येही स्क्रीनिंग करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, सिनेमाचे देशभरातील अनेक शो हाऊसफुल्ल झाले. 
हा सिनेमा गुरुवारपर्यंत थिएटरमध्ये असेल. 

ट्रेडनुसार, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगा'ला मिळालेला हा प्रतिसाद आजही शाहरुख किंग खान असल्याचं दाखवून देत आहे. प्रेक्षक शाहरुखच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात असल्याची ही झलक असल्याचंही म्हटलं जात आहे. सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहता आजही प्रेक्षकांचं शाहरुख खानवर किती प्रेम आहे हेच यातून सिद्ध होत आहे. तर दुसरीकडे, परदेशातही शाहरुखची जादू आहे.  दुबईतील बुर्ज खलिफावर शाहरुखचे छायाचित्र लावून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा : दीपिका-रणवीरमध्ये सारं काही आलबेल?

शाहरुख खानच्या  नव्या वर्षाची सुरुवात सिद्धार्थ आनंदच्या स्पाय-थ्रीलर असलेल्या पठाण सिनेमाने होत आहे. त्यानंतर अ‍ॅटली-हेल्मडचा जवान हा अ‍ॅक्शन सिनेमा रिलीज होणार आहे. तर राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतीक्षित डंकी या सिनेमासह 2023 च्या शेवटी रिलीज होणार आहे. 2018 मध्ये झिरो फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख सिनेमात दिसलाच नाही. त्यामुळे आता त्याच्या आगामी सिनेमांकडून निर्मात्यांनाही मोठी अपेक्षा आहे. निर्मात्यांचे शाहरुखवर जवळपास 500 कोटी रुपये लागलेले आहेत. आता 25 जानेवारीला रिलीज होणारा शाहरुखचा पठाण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किंग खानची जादू कायम ठेवणार का तेच पहायचं.. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी