सुहाना खानने कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मारली जबरदस्त एंट्री, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

बी टाऊन
Updated Aug 29, 2019 | 18:23 IST

Suhana Khan College Entry: अभिनेत्री सुहाना खान हिने नुकतंच न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. तिने कॉलेजच्या पहिल्याच दिवशी अशी काही एंट्री घेतली आहे की, ज्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

suhana_collage
सुहाना खानची 'कुछ कुछ होता है' स्टाइलने कॉलेजमध्ये एंट्री  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुहानाने अॅक्टिंग कोर्ससाठी घेतला न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश 
  • या वर्षी जून महिन्यातच सुहानाने केलं होतं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण
  • न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतरच सुहाना बॉलिवूडमध्ये येणार

न्यूयॉर्क: बॉलिवूडचा किंग खान आणि त्याची पत्नी गौरी यांची मुलगी सुहाना खान ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिने आता जगातील सगळ्यात मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. तसं पाहिल्यास सुहाना ही आपले आई-वडील शाहरुख आणि गौरी खान यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिने नुकतंच जगातील सर्वात मोठं विद्यापीठांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश घेतला आहेत. 

होय... ग्रॅज्युएट झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यात सुहाना खानने न्यूयॉर्क विद्यापीठात अॅक्टिंग स्टडीसाठी प्रवेश घेतला आहे. आता सुहानाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यापीठात पहिल्याच दिवशी सुहाना जात असतानाचा हा व्हिडिओ आहे. जो आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुहान खान व्हाइट टी-शर्ट, डेनिम शॉर्ट्स आणि स्नीकर्स परिधान करुन कॉलेजच्या जिन्याच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. सुहानाचा हा व्हिडिओ अभिनेत्री राणी मुखर्जीची आठवण देतो. ज्याप्रमाणे कुछ कुछ होता है सिनेमात राणीने कॉलेजमध्ये एंट्री घेतली होती. तशीच काहीशी एंट्री आता सुहानाने रियल लाइफमध्ये आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश करताना घेतली आहे. 

 

 

दरम्यान, याच वर्षी सुहाना खानने इंग्लंडमधील ससेक्स येथील आर्डिंगली कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. यावेळी तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी वडील शाहरुख खान, आई गौरी खान आणि भाऊ अबराम हे पोहचले होते. शाहरुख आणि गौरीने मुलगी ग्रॅज्युएट झाल्यानंतर सोशल मीडियावर आपला आनंद देखील व्यक्त केला होता. याच सेरेमनीमध्ये सुहानाला ड्रामा सोसायटीमध्ये भाग घेतल्याबद्दल देखील एक विशेष पुरस्कार देण्यात आला होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

 

सुहाना आपला अॅक्टिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते. तिने आपल्या एका मुलाखतीत देखील म्हटलं होतं की, काम (अभिनय) सुरु करण्यापूर्वी त्याविषयी शिकू इच्छिते. यासाठीच सुहाना सर्वात आधी आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#brother ?

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

 

सुहाना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती स्वत: विषयीचे अनेक अपडेट इंस्टाग्राम आणि इतर सोशल साइटवर शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील अनेक आहेत. गेले काही वर्ष इंग्लंडमध्ये राहणारी सुहाना आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत राहणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...