Shah Rukh Khan: शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टमने रोखले, तासभराच्या चौकशीनंतर 6.83 लाखांचा दंड

बी टाऊन
Updated Nov 12, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shah Rukh Khan: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याच्या टीमला रोखल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कस्टम ड्युटी न भरल्याने जवळपास तासभर शाहरुखची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर अखेर 6.83 लाख शाहरुखला भरावे लागले. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

shahrukh khan stopped customs department at mumbai airport while returning from dubai
कस्टम ड्युटी चुकवल्याने शाहरुखला रोखले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले
  • शाहरुखची जवळपास तासभर चौकशीही करण्यात आली
  • कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखला रोखण्यात आले होते

Shah Rukh Khan: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने शाहरुख खान  (Shah Rukh Khan) आणि त्याच्या टीमला रोखल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कस्टम ड्युटी न भरल्याने जवळपास तासभर शाहरुखची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर अखेर 6.83 लाख शाहरुखला भरावे लागले. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या. (shahrukh khan stopped customs department at mumbai airport while returning from dubai)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर रोखले. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. किंग खानचा अंगरक्षक रवी आणि त्याच्या टीमला मात्र, कस्टमने थांबवले.  वृत्तानुसार, लाखो रुपयांची घड्याळे भारतात आणणे, शाहरुखच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे आणि कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल अभिनेता शाहरुख खानची चौकशी करण्यात आली.चौकशी केल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ६.८३ लाखांचा दंड भरून सर्वांना सोडून देण्यात आले.

 

अधिक वाचा : 'उत्तर भारतीय बिल्डरसाठी ठाकरेंना माझं...' किर्तीकर बरसले


काय आहे संपूर्ण प्रकरण

किंग खान शाहरुख त्याच्या टीमसह दुबईला खासगी चार्टर VTR-SG ने बुक लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. रात्री साडेबारा वाजता या खाजगी चार्टर विमानाने मुंबईला परतला.शुक्रवारी रात्राी कस्टमला शाहरुख खान आणि त्याच्या टीमच्या बॅगेत लाखो रुपयांची घड्याळे सापडली. यानंतर कस्टम अर्थातच सीमा शुल्क विभागाने शाहरुखच्या संपूर्ण ताफ्याला थांबवून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. तपासादरम्यान बॅगमध्ये अनेक महागडी घड्याळे, Babun & Zurbk घड्याळ, Rolex घड्याळाचे 6 बॉक्स, Spirit  ब्रँडचे घड्याळ (सुमारे 8 लाख रुपये), ऍपल सिरीजची घड्याळे सापडली. तसेच घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या सर्व घडयाळांची किंमत सुमारे 17 लाख 56 हजार 500 रुपये इतकी आहे. या घड्याळांवर लाखो रुपयांचा कर भरावा, असे सांगण्यात आले. तासाभराच्या प्रक्रियेनंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र शाहरुख खानचा अंगरक्षक रवी आणि टीम सदस्यांना थांबवण्यात आले.

शाहरुखचा अंगरक्षक रवीने कस्टम ड्युटीची रक्कम भरली

कस्टमकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा बॉडी गार्ड रवीने 6 लाख 83 हजार रुपये दंड भरलेला आहे. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डवरून पैसे भरण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.शाहरुखचा अंगरक्षक रवीला सकाळा 8 वाजता सोडण्यात आले. 

अधिक वाचा : मुलींना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी

शाहरुख खान या आगामी सिनेमांमध्ये दिसणार आहे

2018 नंतर शाहरुख पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. पठाण हा त्याचा बहुचर्चित सिनेमा आता रिलीजसाठी तयार आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोणआणि जॉन अब्राहमदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यानंतर शाहरुख 'जवान'मध्ये दिसणार आहे. याशिवाय राजकुमार हिरानी निर्मित 'डंकी' सिनेतादेखील शाहरुख दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी