Suhana Khan's Birthday toaday : शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि गौरी खानची (Gauri Khan) मुलगी सुहाना खान आज तिचा 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत. तिची आई गौरी खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सुहाना खान झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
सुहाना खानचा जन्म 22 मे 2000 रोजी झाला. ती आज 22 वर्षांची झाली.
सुहाना खानच्या गॉर्जियस लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो.
सुहाना खान तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनच्या बाबतीत ती मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करते.
सुहाना खान अनेकदा तिचे बोल्ड आणि क्युट फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.
सुहाना खानला तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
सुहाना खान खानला दोन भाऊ आहेत. एकाचे नाव आर्यन खान तर दुसऱ्याचे नाव अबराम खान आहे.
तुम्हाला माहीत असेलच की सुहाना ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी आहे. सुहानाच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने आपल्या मुलीला अतिशय गोंडस पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.