Shahrukh Khan stunt double Hasit Savani: ब्रह्मास्त्रमधील शाहरुख खानच्या स्टंट डबलचा 'तो' फोटो व्हायरल; म्हणाला, "अशी संधी मिळणं हे भाग्यच"...

बी टाऊन
Updated Sep 18, 2022 | 20:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

ब्रह्मास्त्र (Brahmastra) सिनेमात शाहरुख खानचा (Shahrukh khan) स्टंट डबल होता हसित सावनी. हसितने शाहरुख खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Shahurkha khan stunt double photo viral on social media
शाहरुख खानच्या स्टंट डबलचा 'तो' फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मास्त्र सिनेमातील शाहरुख खानचा कॅमिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
  • हसित सावनी ब्रह्मास्त्र सिनेमात शाहरुख खानचा स्टंट डबल होता.
  • हसितने मार्वल, डीसी व्यतिरिक्त अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

Shahrukh Khan stunt double Hasit Savani: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र (Brahmastra) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia bhatt) कामाचं खूप कौतुक होत आहे. सिनेमाला बॉयकॉट करण्याचा ट्रेण्डसुद्धा झाला. असं असूनही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. (Shahurkha khan stunt double photo viral on social media )


ब्रह्मास्त्र सिनेमातील शाहरुख खानचा वानरस्त्र अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्ये चाहते शाहरुखच्या एंट्रीवर शिट्ट्या वाजवत टाळ्या वाजवत आहेत. त्यातच ब्रह्मास्त्रच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहरुख खान त्याचा स्टंट डबल हसित सावनीसोबत पोज देत आहे. हसित सावनीने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शाहरुख खान आणि त्याने एकसारखे कपडे घातले आहेत.

अधिक वाचा : Navratri 9 Colors: 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग

हसित सावनीने शाहरुख खानसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "शाहरुख खानसारख्या दिग्गज कलाकाराचा स्टंट डबल साकारण्यासाठी भाग्यच लागतं. हा स्टंट डबल साकारताना मजा आली."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Hasit Savani (@hasitsavani)

अधिक वाचा :  'या' आहेत 'बिग बॉस'च्या घरातील खास गोष्टी

२०१९ मध्ये सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स शूट करताना त्याने हा फोटो काढला होता.हसित हा एक आंतरराष्ट्रीय स्टंट कलाकार आहे. हसितने वयाच्या आठव्या वर्षी जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षणे घेतले.लंडनमधील क्रीडा संकुलात त्याने 19 फूट 7 इंचांची फ्लिप फॉरवर्ड जंप केली. यासाठी त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले. हसित हा  मार्शल आर्ट्सचा ट्रेंड आहे.

हसितने मार्व्हलच्या Avengers: The Age of Ultron आणि Guardians of the Galaxy या सिनेमांमध्ये स्टंट समन्वयक म्हणूनही काम केले आहे. हसितने नुकत्याच रिलीज झालेल्या मार्वल सिनेमात 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' मध्येही काम केले आहे. हसितने त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने विल स्मिथच्या अलादिन या हॉलिवूडपटातही काम केले होते. याशिवाय पेनीवर्थने डीसीची फिल्म जस्टिस लीग, वंडर वुमन आणि नो टाइम टू डाय यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

अधिक वाचा : सायरस मिस्त्रींचा मृत्यू झालेल्या ठिकाणी 263 अपघात,62 मृत्यू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी