Siddhant Kapoor Drug Test: ड्रग्ज प्रकरणात अडकला सिद्धांत कपूर; शक्ती कपूर यांनी दिली सावध प्रतिक्रिया

बी टाऊन
Updated Jun 13, 2022 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shakti Kapoor Reacts to Siddhant Kapoor Drug Test । बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे.

Shakti Kapoor gave his first reaction after Siddhanth Kapoor got involved in a drugs case
सिद्धांत ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शक्ती कपूर म्हणाले...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे.
  • शक्ती कपूर यांनी दिली सावध प्रतिक्रिया.
  • सिद्धांत एक अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे.

Shakti Kapoor Reacts to Siddhant Kapoor Drug Test । मुंबई : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. बंगळुरू पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला असता तिथे सिद्धांत ड्रग्जचे सेवन करत असताना पकडला गेला. लक्षणीय बाब म्हणजे सिद्धांतची ड्रग्ज चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. सिद्धांतचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र याच्यावर विश्वास बसत नाही. (Shakti Kapoor gave his first reaction after Siddhanth Kapoor got involved in a drugs case). 

अधिक वाचा : पराभवाने चवताळलेल्या अफगाणी खेळाडूंचा VIDEO

शक्ती कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

ईटाइम्सने शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी म्हटले की, "मी फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की हे शक्य नाही". या माहितीनुसार सिद्धांत रविवारी मुंबईहून बंगळुरूला निघाला होता आणि रात्री उशिरा बंगळुरू येथे एका रेव्ह पार्टीत पकडला गेला. माहितीनुसार, पोलिसांना याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला होता. 

दरम्यान, तिथे अनेक संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये सिद्धांत कपूरच्या चाचणीसह इतर ६ जणांची देखील चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बंगळुरूच्या पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर एस गुलेद यांनी म्हटले की, "सिद्धांत कपूरची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला उलसूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे."

जेव्हा श्रद्धा कपूरची झाली होती चौकशी

लक्षणीय बाब म्हणजे २०२० मध्ये अभिनेता सुशात सिंग राजपूतने आत्महत्या केल्याची माहिती आहे. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावले. यादरम्यान श्रद्धाने सांगितले होते की, छिछोरे चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी ती सुशांतच्या पवना गेस्टहाऊसमध्ये गेली होती, परंतु तिने कोणत्याही प्रकारच्या अमंली पदार्थांचे सेवन केल्याच्या सर्व वृत्तांचे खंडन केले होते.

अभिनेता आहे सिद्धांत कपूर

सिद्धांत कपूरबद्दल भाष्य करायचे झाले तर तो एक अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. त्याने 'भागम भाग', 'चुप चुप के' आणि 'भूल भुलैया' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर त्याने 'शूटआउट ॲट वडाळा', 'अग्ली', 'जज्बा', 'पलटन', 'हसीना पारकर' आणि 'चेहरे' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी