Shamshera Film : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'शमशेरा' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक रिलीज केल्यानंतर आता निर्मात्यांनी टीझरही रिलीज केला आहे. टीझरमध्ये शमशेराच्या भूमिकेतील रणबीर कपूर व संजय दत्तची स्टाईल खूप खतरनाक आहे.त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगचा एक BTS व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये संजयचा लूक आणि भूमिका दिसत आहे. (Shamshera BTS Video: Sanjay Dutt has done a lot of practice for dangerous look and screen presence, showing the villain behind the scenes))
अभिनेता संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. तो पुन्हा खलनायकी भूमिकेसाठी परतला आहे. करण मल्होत्राचा शमशेराचा ट्रेलर नुकताच लाॅंच झाला. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरच्याविरोधात पहिल्यांदाच दुष्ट, खतरनाक, निर्दयी आणि क्रूर व्यक्तीची भूमिका साकारली होती.
चार वर्षांपूर्वी रणबीर कपूरने राजकुमार हिराणीच्या संजू चित्रपटात संजय दत्तची भूमिका केली होती. त्यामुळे आता पहिल्यांदा शमशेराच्या निमित्ताने स्क्रीनवर संजू विरुद्ध संजू असेल, जो पाहण्यासाठी सर्वात मोठा ऑन-स्क्रीन संघर्ष ठरला आहे. शमशेराचा टीझर आणि ट्रेलर समोर येताच, संजयने त्याच्या जगब कामगिरीने सर्वांना थक्क केले.
अग्निपथनंतर संजय पुन्हा दिग्दर्शक करण मल्होत्रासोबत काम करत आहे. संजयने त्या चित्रपटात कांचा चीनाच्या भूमिकेत आपल्याला आश्चर्यचकित केले. तसेच शमशेरामधील शुद्ध सिंगला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी आशा कलाकारांना आहे. रणबीरशिवाय या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत.