रणबीर कपूरचा Danger Look, अखेर 4 वर्षांनंतर 'त्या' सिनेमाचा Teaser रिलीज

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jun 22, 2022 | 15:24 IST

Shamshera Movie Teaser: शमशेरा सिनेमाचा 1 मिनिटं 21 सेकंदांचा टीझर रिलीज झाला आहे. याव्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) ही या सिनेमात दिसणार आहे.

Shamshera Movie Teaser
Shamshera Teaser  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गेल्या चार वर्षांपासून फॅन्स अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या एका सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
  • रणबीर कपूरचा सिनेमा शमशेरा लवकरच रिलीज होणार आहे.
  • याव्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) ही या सिनेमात दिसणार आहे.

नवी दिल्ली: गेल्या चार वर्षांपासून फॅन्स अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या एका सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर तो दिवस आता आला आहे, रणबीर कपूरचा सिनेमा शमशेरा लवकरच रिलीज होणार आहे. शमशेरा सिनेमा 22 जुलै 2022 ला रिलीज होणार (Shamshera Release Date) आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरचा या सिनेमाताली पहिला लूक समोर आला होता. आता सिनेमाचा टीझरही (Teaser) रिलीज झाला आहे. टीझरमध्ये रणबीरचा टेंझर असा भयानक लूक समोर आला आहे. याव्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) ही या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमातील संजय दत्तचीही पहिली झलक दिसली आहे. 

1 मिनिटं 21 सेकंदांचा टीझर 

शमशेरा सिनेमाचा 1 मिनिटं 21 सेकंदांचा टीझर रिलीज झाला आहे. एका समाजातील लोकांवर खूप अत्याचार आणि छळ होत असतात. पोलिसांच्या वर्दीत संजय दत्त दिसून येत आहे. टीझरमध्ये काही लोकं संजय दत्तच्या (Sanjay Dutt) हातापाया पडून कसली तरी विनंती करत असल्याचं दिसतंय. तेव्हाच रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) एन्ट्री होते. रणबीर या लोकांना वाचवण्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसतोय. 

टीझरमध्ये शमशेराची (Shamshera Teaser)भूमिका करताना रणबीर कपूर म्हणतोय की,  'सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा, कोई रोक न पाएगा इसे, जब उठे ये बनकर सवेरा। कर्म से डकैत, धर्म से आजाद।'

टीझरमध्ये रणबीर कपूर इंग्रजांशी युद्ध करतानाही दिसतोय. 

येथे बघा शमशेरा सिनेमाचा टीझर (Shamshera Movie Teaser)

तीन शहरात रिलीज होणार ट्रेलर 

शमशेरा सिनेमाचा ट्रेलर मेकर्स लवकरच रिलीज करणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर एक नाही तर तीन शहरांमध्ये रिलीज करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाची कथा काल्पनिक शहर काजावर आधारित आहे. येथे आदिवासी जनरल शुध सिंह यांच्या छळाला कंटाळले आहेत. टीझरमध्ये दिसतंय की, केजीएफ 2 नंतर शमशेरामध्ये ही संजय दत्त निगेटिव्ह रोल साकारणार आहे. सिनेमाची कथा 19 व्या शतकातली आहे. टीझरमध्ये जबरदस्त वॉर सीन, व्हिज्युअल इफेक्ट्स दिसत आहेत. शमशेरा हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगुमध्ये ही रिलीज होणार आहे. 

शमशेरा सिनेमाच्या माध्यमातून रणबीर कपूर जवळपास चार वर्षानंतर सिनेमात कमबॅक करत आहे. याआधी रणबीर कपूर संजय दत्तचा बायोपिक सिनेमा संजूमध्ये दिसला होता. रणबीर कपूर याव्यतिरिक्त ब्रह्मास्त्र सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात रणबीरच्या अपोझिट त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट आहे. तर रणबीर सिनेमा एनिमलमध्ये श्रद्धा कपूरमध्ये दिसेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी