Ajay Devgan Reply To A Social Media User: हा फोटो शेअर करत युजर्सने उडवली अजय देवगणच्या स्टंटची खिल्ली, अभिनेत्याने दिले सडेतोड उत्तर

बी टाऊन
Updated Jul 07, 2022 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ajay Devgn Reply To A Social Media User: एका सोशल मीडिया यूजरने एक फोटो शेअर करून अजय देवगणची खिल्ली उडवली आहे. बॉलिवूड अभिनेत्याने देखील सोशल मीडिया युजरला चोख प्रत्युत्तर दिले.

Sharing this photo, users made joke of Ajay Devgan's stunt, the actor gave a blunt answer
युजरने उडवली खिल्ली, अजय देवगणचे चोख प्रत्युत्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडिया यूजरने अजय देवगणची खिल्ली उडवली.
  • अभिनेता अजय देवगण विनोदी असण्यासोबतच शांत आहे.
  • अभिनेत्यानेही युजरला दिले चोख प्रत्युत्तर

Ajay Devgn Reply To A Social Media User: अजय देवगण हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील असा एक अभिनेता आहे जो नेहमी शांत असतो.तो कोणत्याही गोष्टीवर तेवढेच बोलतो जेवढे त्याला बोलणे आवश्यक वाटते. पण तो बाहेरून जितका शांत आहे तितकाच तो खोडकर आहे. अलीकडेच एका सोशल मीडिया युजरने अजय देवगणच्या 'फूल और कांटे' 
या बॉलिवूड डेब्यू चित्रपटात दाखवलेल्या स्टंटची खिल्ली उडवणारा फोटो शेअर केला आहे. एका सोशल मीडिया यूजरने शेअर केलेला फोटो बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नजरेस पडला. यानंतर अभिनेत्याने या सोशल मीडिया यूजरला त्याच्या मजेशीर शैलीत सडेतोड उत्तर दिले

अधिक वाचा : ठाण्यातील एकमेव नगरसेविका मातोश्रीच्या जवळ

अजय देवगणचा 'फूल और कांटे' हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अजय देवगणचा एक सीन होता जो आयकॉनिक ठरला. तुम्हाला आठवत असेल, अजय देवगण फूल और कांटे या चित्रपटात दोन बाईकवरून आला होता. या स्टंटची खिल्ली उडवत एका सोशल मीडिया यूजरने दोन चहाच्या कपांवर समोसा ठेवला. हा फोटो शेअर करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'Ajay Devgan samosa #MumbaiRains #MondayMotivation एन्जॉय करत आहे.' या फोटोवर अजय देवगणची नजर पडताच त्याने सोशल मीडिया यूजरला मजेशीर उत्तर दिले.

अधिक वाचा : पुण्यात पेट्रोल - डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


या फोटोला उत्तर देताना अजय देवगणने लिहिले की, 'हा स्टंट प्रत्येकासाठी घरी करणे अत्यंत सुरक्षित आहे.' समोसे खाणे आरोग्यदायी असल्याचे सांगत अभिनेत्याने युजरची खिल्ली उडवली आहे. अजय देवगणचे हे उत्तर पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट भोलाच्या तयारीत व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 30 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबतच अजय देवगण त्याच्या लोकप्रिय चित्रपट 'दृश्यम'च्या सिक्वेलवरही काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी