Sheena Bora Murder Case : 2015 साली संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं शीना बोरा हत्याकांड हे अत्यंत गुंतागुंतीचे असे होते. या प्रकरणात एक-एक करुन दररोज नवनवीन माहिती समोर येत होती आणि या नव्या माहितीने सर्वच अचंबित होत होते. याच प्रकरणावर आता एक वेब सीरिज येणार आहे.
पोलिसांच्या केसनुसार, इंद्राणी मुखर्जीने आपला पहिला पती सिद्धार्थ दास याच्यापासून जन्म झालेल्या शीना बोरा या मुलीची हत्या केली. यासाठी इंद्राणीने आपला दुसरा पती (घटस्फोट दिलेला) संजीव खन्ना आणि ड्रायव्हर यांची मदत घेतली होती. कारण आपला तिसरा पती पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुल याच्यासोबत शीना बोराने लग्न करु नये असे इंद्राणीला वाटत होते.
हे पण वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे
लेखक संजय सिंह म्हणतात, "या केसमध्ये एका आजी-आजोबांना आपल्या नातवंडांचे आई-वडील म्हणून रहावे लागले. त्यांच्या खऱ्या आईला मोठ्या बहीण म्हणून संबोधावे लागले. एक चांगले करिअर असलेल्या सुपर कॉपचाही या प्रकरणात अपमान झाला. या प्रकरणात सर्व काही होतं, ज्यामध्ये हाय प्रोफाईल सोसायटी, मीडिया फेम, राजकारण, पोलिसांचे अंतर्गत वाद, राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचार, नातेसंबंधांचे विचित्र जाळे आणि मोठा गोंधळ. हे हत्याकांड प्रकरण मी कव्हर केले होते आणि त्यामुळे यातील गोंधळ दूर करणे तसेच घटनाक्रम सोप्या पद्धतीने सांगणे आवश्यक आहे."
हे पण वाचा : नवरात्रीत हे स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला देतील जबरदस्त एनर्जी
हिंदीतील सर्वात मोठ्या प्रकाशन समूहाला 75 वर्षे पूर्ण झालेल्या राजकमलने देशातील विविध शहरांत 'किताब उत्सव' आयोजित केला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या किताब उत्सवात गुलजार, जावेद अख्तर, पियुष मिश्रा, सौरभ शुक्ला यांच्यासह अनेक नामवंत लेखकांनी सहभाग घेतला होता. या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना लेखक संजय यांनी सांगितले की, या पुस्तकाचे लेखनही पूर्ण झाले नव्हते की एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्याकडून पुस्तकाचे हक्क विकत घेतले.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
लेखक संजय सिंह हे प्रसिद्ध शोधपत्रकार आहेत. त्यांनी झी न्यूज, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ, नेटवर्क 18, न्यूज एक्स यासारख्या चॅनल्ससोबत काम केले आहे. हजारो कोटी रुपयांच्या तेलगी बनावट मुद्रांक घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचे श्रेयही त्यांना जाते.
हे पण वाचा : ब्रेकअप झाल्यावर मुली करतात हे काम
संजय सिंह यांचे हे तिसरे पुस्तक आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकावर Applause Entertainment ने 'Scam2003: The Telgi Story' नावाने वेब सीरिज बनवली आहे. ज्याचं स्ट्रिमिंग Sony Liv OTT वर लवकरच सुरू होणार आहे. याच्याव्यतिरिक्त राकेश त्रिवेदी यांच्यासोबत मिळून त्यांनी लिहिलेल्या आणि दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 'वर्ल्ड बूक फेअर' मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'CIU: Criminals in Uniform' या पुस्तकावर गेल्या महिन्यात वेब सीरिज जाहीर करण्यात आली आहे.