Shehzada Box Office Collection Prediction Day 1: पहिल्या दिवसाच्या कमाईत कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ बाजी मारेल का?

बी टाऊन
Updated Feb 17, 2023 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलीवूड अभिनेता  कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट शहजादा (Shehzada) आज १७ फेब्रुवारी २०२३ ला रिलीज झाला. कार्तिक आर्यन ने खूप मन लावून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. शाहरुख खानचा चित्रपट  पठाण ने बॉक्स ऑफिस वर उत्कृष्ट काम केले आहे.

Shehzada Box Office Collection Prediction Day 1
पहिल्या दिवसाची कमाई पाहून ‘शहजादा’ खूश होईल की नाराज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बॉलीवूड अभिनेता  कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट शहजादा (Shehzada) आज १७ फेब्रुवारी २०२३ ला रिलीज झाला.
  • कार्तिक आर्यन ने खूप मन लावून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.
  • हजादाच्या पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ६ ते १० कोटींचा असू शकतो.

kartik Aryan's Shehzada: भूल भुलया 2 च्या यशानंतर  बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट शहजादा (Shehzada) आज 17 फेब्रुवारी 2023 ला रिलीज झाला. कार्तिक आर्यनने खूप मन लावून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. शाहरुख खानचा चित्रपट पठाणने बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. कार्तिक आर्यनलाही आपल्या चित्रपटापासून आशाच काही अपेक्षा आहेत. (Shehzada Box Office Collection Prediction Day 1  : How much will Karthik Aaryan's 'Shahzada' earn?)

अधिक वाचा  : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं

मात्र, बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत शेहजादाच्या निर्मात्यांची निराशा होऊ शकते. चित्रपटाला आज जगभराच्या चित्रपटगृहात प्रदर्शित केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायला गेले तर सुरूवातीच्या ट्रेंडला बघून निर्मात्यांच्या हाती निराशा लागू शकते. आज हॉलिवूड चित्रपट अँटी-मॅन 3 (Ant Man 3) पण  रिलीज झाला आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अँट-मॅन 3 ची तिकिटे खूप वेगाने विकली जात आहेत. दुसरीकडे शहजादाच्या हाती निराशा लागू शकते. 

अधिक वाचा  :  तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

पहिल्या दिवशी एवढे कमवेल 'शहजादा' 

 कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकतो याचे काही  सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कार्तिक आर्यनच्या शहजादाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन रिलीजच्या पहिल्या दिवशी खूपच सरासरी असणार आहे. हा चित्रपट डबल डिजीट आकडा पार करण्यात अपयशी ठरू शकतो.  सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार चित्रपट शहजादाच्या पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 6 ते 10 कोटी असू शकते, असा अंदाज आहे. 

अधिक वाचा  : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात

Ant Man 3 कठीण स्पर्धा मिळेल

कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला हॉलिवूड चित्रपट अँट मॅन 3 कडून टक्कर मिळणार आहे. हा चित्रपट आज जगभराच्या चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या अभिनेत्याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शहजादा या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी