Sherlyn Chopra : साजिद खानची झोप उडणार, अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून साजिदविरोधात छळाची तक्रार

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 30, 2022 | 10:46 IST

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिनं दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) शर्लिननं तक्रार दाखल केली.

harassment complaint against Sajid Khan
अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून साजिदविरोधात छळाची तक्रार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिग्दर्शक साजिद खान यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल.
  • जुहू पोलिसांनी काल संध्याकाळी शर्लिनचा जबाब नोंदवला.
  • सलमान खानने मदत करावी असं आवाहनही शर्लिन चोप्राने केलं आहे.

Complaint Against Sajid Khan : बिग बॉसचं 16 वा हंगाम चालू आहे. यात सत्रात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान स्पर्धेक आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या साजिद खानची झोप उडवणारी बातमी हाती आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिनं दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) शर्लिननं तक्रार दाखल केली. साजिद खानला लवकरात लवकर पोलीस जवाब नोंदवण्यासाठी बोलावतील, अशी प्रतिक्रिया देखील शर्लिननं दिली आहे. (Sherlyn Chopra: actress Sherlyn Chopra has filed a harassment complaint against Sajid Khan)

अधिक वाचा  : स्मार्टफोनसाठी 16 वर्षांची मुलगी निघाली रक्त विकायला

जुहू पोलिसांनी काल संध्याकाळी तिचा जबाब नोंदवला आहे. त्यावेळी शर्लिननं माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली की, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. तसेच, पोलिसांनी आश्वासन दिलंय की, ते साजिद खानला लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवतील. "जुहू पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा करावी. मग आरोपी कोणीही असो, तो फराह खानचा भाऊ असो किंवा सलमान खानचा लाडका असो. आज आरोपी बिग बॉसच्या घरात बसून आराम करतोय. मला न्याय हवाय. त्यासाठीच मी पोलिसांकडे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य तो तपास करुन आरोपी साजिद खानला अटक करावी."

अधिक वाचा  : हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू; 82 जखमी

 पुढे बोलताना शर्लिन म्हणाली की, बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खानला मदतीचे आवाहन केले आहे. सलमान खान यांना मी भाईजान बोलते, म्हणजे मी त्यांच्या बहिणी सारखीच आहे. त्यांनी माझी मदत करावी. मी सलमान खान यांच्या घराबाहेर शांतीपूर्वक आंदोलन करणार असल्याचंही शर्लिनने यावेळी सांगितलं. 

दरम्यान, साजिद खान 2018 सालापासून वादात सापडला आहे. #MeTooमोहीम सुरू होती, ज्यामध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांना झालेल्या लैंगिक छळाचा खुलासा केला होता. दरम्यान, अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. अलीकडेच राणी चॅटर्जीनेही साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे साजिदला वर्षभर इंडस्ट्रीत काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान साजिद खान शोमध्ये कायम असून शोच्या निर्मात्याने किंवा सलमान खाननंही त्याच्याविरोधात काहीही बोललं नाही. अलीकडेच साजिदने 'बिग बॉस 16' मधून काम करायला सुरुवात केली. पण अनेक लोक त्याविरोधात आवाज उठवत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी