एकाचवेळी २४०पेक्षा जास्त देशांमध्ये बघता येणार 'शेरनी'

विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला 'शेरनी' हा हिंदी सिनेमा 'अॅमेझॉन प्राइम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'Sherni' Trailer: Vidya Balan's Efforts To Depict Man-animal Conflict In Drama
एकाचवेळी २४०पेक्षा जास्त देशांमध्ये बघता येणार 'शेरनी' 

थोडं पण कामाचं

  • एकाचवेळी २४०पेक्षा जास्त देशांमध्ये बघता येणार 'शेरनी'
  • 'शेरनी' सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत
  • विद्या बालन करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत दिसेल

मुंबईः विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला 'शेरनी' हा हिंदी सिनेमा 'अॅमेझॉन प्राइम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'अॅमेझॉन प्राइम'मुळे 'शेरनी' सिनेमा एकाचवेळी २४०पेक्षा जास्त देशांमध्ये बघता येणार आहे. 'Sherni' Trailer: Vidya Balan's Efforts To Depict Man-animal Conflict In Drama

'शेरनी' सिनेमात विद्या बालन करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत दिसेल.  टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन  न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने केले आहे. व्यंगावर बोट ठेवणाऱ्या आपल्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहे.

पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात. विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.

'सिनेमाच्या कथानकाला काटेरी पैलू आहेत. या निमित्ताने मनुष्य आणि पशू यांच्यातील जटील संघर्षाचा वेध घेतला आहे.  विद्या बालनने मीड-लेव्हल फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारली असून अडथळे आणि तणावपूर्ण स्थितीतही ती आपल्या टीम व स्थानिकांसह पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करत असते. विद्या, अन्य सुंदर कलाकार आणि फारच प्रतिभावान क्रूसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता;' असे दिग्दर्शक अमित मसुरकरने सांगितले. तर कथानक मनाला भावले म्हणून हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्या बालनने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी