मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती टिकटॉकवर नेहमीच व्हिडिओ पोस्ट करत असते. मात्र यावेळी शिल्पानं आपल्या पतीची राज कुंद्राची चांगलीच धुलाई केलीय. शिल्पानं राज कुंद्राला मोलकरीण सोबत रंगेहाथ पकडलं आणि नंतर त्याला झोडपलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आतापर्यंत व्हिडिओला १५ लाख हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
या घटनेनंतर शिल्पा शेट्टीनं आपल्या फॅन्सला सल्ला पण दिलाय. ती या व्हिडिओमध्ये म्हणते, ‘नजर हटी, दुर्घटना घटी, सत्य कळताच नवऱ्याची पिटाई’. हा व्हिडिओ स्वत: शिल्पानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला यानंतर तिच्या फॅन्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. पाहा हा व्हिडिओ आणि जाणून घ्या काय घडलंय नेमकं?
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. या दरम्यान दोघंही मनोरंजनासाठी विविध युक्त्या लढवतांना दिसत आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ नेटकरीही खूप पसंत करत आहेत. सोशल मीडियावर शिल्पाचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
नुकताच दोघांनी एक व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये शिल्पा काही तरी काम करत असते आणि राज तिला किस करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शिल्पा म्हणते काम करतांना किस करायचं नाही. यानंतर साफ-सफाई करणारी मोलकरीण म्हणते मॅडम त्यांना चांगल्या प्रकारे समजवा, मी तर बोलून-बोलून थकली. यानंतर मात्र शिल्पा राज कुंद्राची धुलाई करते.
शिल्पा शेट्टीनं यापूर्वी आपला एक फनी व्हिडिओ पोस्ट केला होता. यात ती खूप फनी दिसतेय. तो व्हिडिओ सुद्धा तिच्या फॅन्सनी खूप पसंत केला. पती राज कुंद्रासोबत वर्कआऊट करतांना आणि रिलॅक्स करतांनाचे टिकटॉक व्हिडिओ सुद्धा यापूर्वी शिल्पानं शेअर केले होते.
आपल्याला माहितीच आहे टिकटॉकवर शिल्पा शेट्टीचे १५ मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत.