शिल्पा शेट्टीची योगा डेक असले व्हॅनिटी, सेट करेल नवा ट्रेंड

Shilpa Shetty Becomes the first bollywood actress to have a vanity van with yoga deck : ताज्या बातमीनुसार बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने स्वतःसाठी एक व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. या व्हॅनमध्ये काही अनोख्या सुविधा आहेत.

Shilpa Shetty Becomes the first bollywood actress to have a vanity van with yoga deck
शिल्पा शेट्टीची योगा डेक असले व्हॅनिटी, सेट करेल नवा ट्रेंड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शिल्पा शेट्टीची योगा डेक असले व्हॅनिटी, सेट करेल नवा ट्रेंड
  • शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक योगा डेक
  • शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये नवा ट्रेंड सेट होण्याची शक्यता

Shilpa Shetty Becomes the first bollywood actress to have a vanity van with yoga deck : सतत शूटिंग, प्रवास, प्रमोशनल इव्हेंट या दगदगीतून विश्रांती घेण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून बॉलिवूड कलाकारांना त्यांची व्हॅनिटी व्हॅन प्रचंड प्रिय असते. स्टेटस आणि कम्फर्ट या दोन्ही दृष्टीने रिलॅक्स करायला बॉलिवूड कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन आवडते. ताज्या बातमीनुसार बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने स्वतःसाठी एक व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. या व्हॅनमध्ये काही अनोख्या सुविधा आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक योगा डेक आहे. शिल्पाला फिटनेस जपणे आवडते. फिटनेस राखण्यासाठी योगासने करणे शिल्पाला आवडते आणि ही बाब आता जगजाहीर झाली आहे. याच कारणामुळे शिल्पा शेट्टीने प्रवासात असताना योगासने करणे सोयीचे व्हावे यासाठी व्हॅनिटी व्हॅनवर योगा डेक तयार करुन घेतला आहे. या डेकवर योगासने करणे आणि फिटनेस जपणे शिल्पाला शक्य होणार आहे. 

शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये नवा ट्रेंड सेट होण्याची शक्यता आहे. भविष्यात नव्या व्हॅनिटी व्हॅन खरेदी करताना कलाकार व्हॅनच्या छतावर छोटेखानी जिम तयार करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी