शिल्पा शेट्टी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सोशल मीडियावर शिल्पाची भावनिक पोस्ट

बी टाऊन
विजय तावडे
Updated Sep 18, 2021 | 18:46 IST

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचं एक पान शेअर केलंय. भविष्यातील निर्णयाचं हे सूतोवाच तर नाही ना?

Shilpa Shetty ready to make a big decision? emotional post on social media
शिल्पा शेट्टी भविष्यात घेऊ शकते मोठा निर्णय !  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भविष्यात मोठा निर्णय घेण्याचे शिल्पा शेट्टीचे संकेत
  • सोशल मीडियावर पोस्ट करत दिले संकेत
  • इंस्टाग्रामवर शिल्पाची भावनिक पोस्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक पोस्टने केली आहे. इंस्टाग्रामवर तिने अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचं एक पान शेअर केलंय. याद्वारे तिने भविष्यातील तिच्या निर्णयाबद्दल सूतोवाच केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगतेय. पती राज कुद्रांच्या पॉर्नोग्राफीप्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी खूपच चर्चेत आहे. ती सतत प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय. अशीच एक प्रेरणादायी, नव्याने आयुष्याची सुरूवात करण्याबाबत विचार करायला लावणारी पोस्ट शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलीय. 
 

शिल्पाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या पेजवर असं म्हटलंय, ' असं एकदम आयुष्यातून कोणीही जाऊ शकत नाही, मात्र, आपण एक नवी सुरूवात नक्कीच करू शकतो. आज, लगेचच कोणीही नवी सुरूवात करू शकतात. आयुष्यातील बराच काळ आपण घडलेल्या चुका, घेतलेल्या चुकीच्या निर्णयावर विचार करण्यात घालवतो. कोणी कितीही विचार केला, प्रयत्न केला तरी भूतकाळ बदलू शकत नाही. चुकांची पुनरावृत्ती न करता घडलेल्या चुकांमधून शिका आणि सगळ्यांशी चांगल वागा. शिल्पा शेट्टीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर
चांगलीच व्हायरल होतेय. 


शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लिल चित्रपटप्रकरणी जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. राज कुंद्राचं नाव पॉर्नोग्राफीप्रकरणी आल्यानंतर शिल्पा काही काळ सोशल मीडियापासून आणि चित्रीकरणापासून दूर होती. शिल्पा शेट्टी नुकतीच माता वैष्णो देवीच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. याशिवाय, राज कुंद्रा प्रकरणात, मुंबई पोलिसांनी 43 साक्षीदारांचे जबाब चार्टशीटमध्ये नोंदवले आहेत. या 43 साक्षीदारांमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार, शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना सांगितले की, ती तिच्या कामात खूप व्यस्त होती, त्यावेळी राज कुंद्रा काय करत होता, हे तिला माहित नव्हते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी