Shilpa Shetty Returns To Social Media: शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर पुनरागमन, सुपरवुमनच्या अवतारात, लवकरच होणार निकम्मा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

बी टाऊन
Updated May 16, 2022 | 20:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shilpa Shetty Returns To Social Media: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एका खास अवतारात पुनरागमन केले आहे. एका नवीन अवतारात ती सोशल मीडियावर दाखल झाली आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी प्रोजेक्ट निकमाचा ट्रेलर रिलीजची डेट सांगितली आहे.

Shilpa Shetty returns on social media, in Superwoman avtar
शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर वापसी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला बाय-बाय केले होते.
  • सोशल मीडियावर परत येण्याचे आश्वासन देऊन शिल्पा निघून गेली होती.
  • अभिनेत्री सोशल मीडियावर अतिशय मनोरंजक पद्धतीने परतली.

Shilpa Shetty Returns To Social Media As A Superwoman: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने जाहीर केले की ती सोशल मीडियाला काही काळासाठी अलविदा करत आहे. मात्र, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना वचन दिले होते की ती सोशल मीडियावर नक्कीच पुनरागमन करेल. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले. शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा सोशल मीडियावर परतली आहे. सोशल मीडियावर ती एका खास अवतारात परतणार असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं, अगदी तसंच झालं. सोशल मीडियावर पुनरागमन करण्यासोबतच, अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टचा ट्रेलर लॉन्च देखील केला.


शिल्पा शेट्टी कुंद्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्टॉप मोशन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी एका सुपरवुमनच्या भूमिकेत दिसत आहे. तिने निळ्या आणि लाल रंगाचा पोशाख घातला आहे आणि तिच्या हातात तलवार आहे. यासोबतच तिने सोनेरी टाचांचे बूट देखील परिधान केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'अगदी नवीन अवतारात, खरी अवनी कोण आहे? 17 मे रोजी 11.30 वाजता निकम्मा ट्रेलर लाँच होणार आहे'

शिल्पा शेट्टी तिच्या आगामी प्रोजेक्ट निकम्मामध्ये अवनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी दिसणार हे पात्र तिने तिच्या कारकिर्दीत साकारलेल्या पात्रांपेक्षा खूपच वेगळे असणार आहे.या चित्रपटाद्वारे अभिनेत्री पुन्हा एकदा आपली जादू दाखवायला सज्ज झालेली आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत अभिमन्यू आणि शर्ली शेटिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' हा चित्रपट यावर्षी 17 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी